‘पंचगंगेची पूररेषा मुख्यमंत्र्यांनी बदलली’

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 August 2019

‘विकास आराखड्यातच (डीपी) पंचगंगा नदीच्या पूररेषेत (ब्लू आणि रेड लाइन) बदल झाला असून, ती अरुंद केली आहे. त्यामुळेच कोल्हापूरला पुराचा फटका बसला आहे,’’ असे पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवाडकर यांनी मंगळवारी सांगितले. पूररेषेतील बदलाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. त्यामुळे तेच या पुराला जबाबदार आहेत, असा ठपकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ठेवला.

पुणे - ‘विकास आराखड्यातच (डीपी) पंचगंगा नदीच्या पूररेषेत (ब्लू आणि रेड लाइन) बदल झाला असून, ती अरुंद केली आहे. त्यामुळेच कोल्हापूरला पुराचा फटका बसला आहे,’’ असे पर्यावरणतज्ज्ञ सारंग यादवाडकर यांनी मंगळवारी सांगितले. पूररेषेतील बदलाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. त्यामुळे तेच या पुराला जबाबदार आहेत, असा ठपकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर ठेवला. 

दरम्यान, या आपत्तीला जबाबदार घटकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

कोल्हापूर, सांगली आणि परिसरातील पूरस्थितीच्या कारणांचा शोध यादवाडकर यांनी घेतला व नंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

यादवाडकर म्हणाले, ‘‘पंचगंगेची पूररेषा शास्त्रीय पद्धतीऐवजी जुन्या पूरस्थितीचा आढावा घेऊन ढोबळपणे आखली होती. त्याला १९८४, ८९ आणि २००५ मधील पुराचा संदर्भ जोडला होता. त्याला न्यायालयाने आक्षेप घेऊन शास्त्रीय पद्धतीने पूररेषा निश्‍चित करण्याचा आदेश पाटबंधारे खात्याला दिला होता. त्यानंतर नव्याने पूररेषा ठरविली. मात्र, शहराच्या विकासासाठी सुमारे ५०० हेक्‍टर जागा ताब्यात घेण्याच्या उद्देशाने पूररेषा अरुंद करण्यात आली. हे क्षेत्र निवासी दाखविले. त्यावर व्यावसायिक बांधकामे झाली. त्यासाठी नदीपात्रालगत जागोजागी भू-भराव टाकून जागेची उंची वाढविली आहे. त्यामुळे पूरस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchganga River Floodline Change by Chief Minister