जुलै-ऑगस्टचे पंचनामे पूर्ण! अतिवृष्टीने २२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mantralay
जुलै-ऑगस्टचे पंचनामे पूर्ण! अतिवृष्टीने २२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जुलै-ऑगस्टचे पंचनामे पूर्ण! अतिवृष्टीने २२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सोलापूर : जुलै-ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे राज्यातील २७ जिल्ह्यातील २१ लाख ८१ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. जुलैचा पंचनामा अहवाल शासनाला सादर झाला आहे. नुकसानग्रस्तांना आता वाढीव मदत मिळणार आहे. जिरायतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीसाठी २७ हजार आणि फळबागांसाठी ३६ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालानुसार राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व सोलापूर या २७ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास १५ लाख ३० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. पण, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्या क्षेत्रात वाढ झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून पंचनामे उरकण्यात आले असून त्याचा अहवाल आता कृषी विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे. अधिवशेन संपल्यानंतर नुकसानीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मदत मिळणार आहे. जुलैमध्ये २६ जिल्ह्यातील १८ लाख २१ हजार हेक्टर तर ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे सात जिल्ह्यातील तीन लाख ६० हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पंचनामे जुन्याच निकषांनुसार पार पडले असले, तरीदेखील शेतकऱ्यांना नवीन निकषांनुसार वाढीव मदत मिळेल, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना भरपाईपोटी साधारणत: १४ ते १६ हजार कोटी रुपये लागतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

निर्णय जून २०२२ पासून लागू राहील

अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी वाढीव मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तो निर्णय जून २०२२ पासून लागू राहील. जुलै-ऑगस्टमधील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनाही या निर्णयानुसार नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
- संजय धारुरकर, संचालक, मदत व पुनर्वसन

 1. मदतीची रक्कम व बाधित क्षेत्र
  जुलैमधील नुकसान
  १८.२१ लाख हेक्टर
  ऑगस्टमधील बाधित क्षेत्र
  ३.६० लाख हेक्टर
  जिरायतीसाठी हेक्टरी मदत
  १३,६००
  बागायतीसाठी हेक्टरी मदत
  २७,०००
  फळबागांसाठी हेक्टरी मदत
  ३६,०००

Web Title: Panchnama Of July August Is Complete Crop Damage On 22 Lakh Hectares Due To Heavy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..