esakal | मोठी ब्रेकिंग! पंढरपूरची एसटी बस 48 तासांसाठी राहणार बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

images_1540788570710_st_mahamandal.jpg

ठळक बाबी... 

 • मंदिरे सुरु करावीत, भजन, किर्तनास परवानगी द्यावी, या मागणीसाठी वंचित आघाडी आंदोलन 
 • सोमवारी (ता. 31) पंढरीत आंदोलन होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली तोडफोडीची शक्‍यता 
 • आंदोलन न करण्याचे आवाहन, मात्र आंदोलक मागण्यांवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांचे एसटी महामंडळाला पत्र 
 • पंढरीतील आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील बससेवा बंद करण्याचे दिले आदेश 
 • सोलापूर विभागातील बससेवा आज मध्यरात्रीपासून उद्या सोमवारी (ता. 31) रात्री 12 पर्यंत राहणार बंद 
 • पुणे-सोलापूर आणि सोलापूर-पुणे बससेवा 48 तासांसाठी स्थगित करण्याचा झाला निर्णय 
 • सांगलीसह अन्य भागातून येणाऱ्या बस सांगोल्याहूनच परत फिरणार; सोलापूर स्थानकावरील बस पुणे, पंढरपूरकडे धावणार नाहीत 
 • सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने सुरु केले नियोजन 

मोठी ब्रेकिंग! पंढरपूरची एसटी बस 48 तासांसाठी राहणार बंद 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्य सरकारने अनलॉक जाहीर केल्यानंतर बाजारपेठा, प्रवासी वाहतूक, हॉटेल, मॉल्स, उद्योगांना परवानगी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता राज्यातील मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी, भजन, किर्तनासही परवानगी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी उद्या (सोमवारी) पंढरीत ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहूजन आघाडी आणि वारकरी संघटनांतर्फे मंदिर प्रवेश आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातील बससेवा बंद ठेवावी, तोडफोडीची शक्‍यता नाकारता येत नाही, असे पत्र विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांना दिले आहे. 

ठळक बाबी... 

 • मंदिरे सुरु करावीत, भजन, किर्तनास परवानगी द्यावी, या मागणीसाठी वंचित आघाडी आंदोलन 
 • सोमवारी (ता. 31) पंढरीत आंदोलन होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली तोडफोडीची शक्‍यता 
 • आंदोलन न करण्याचे आवाहन, मात्र आंदोलक मागण्यांवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांचे एसटी महामंडळाला पत्र 
 • पंढरीतील आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील बससेवा बंद करण्याचे दिले आदेश 
 • सोलापूर विभागातील बससेवा आज मध्यरात्रीपासून उद्या सोमवारी (ता. 31) रात्री 12 पर्यंत राहणार बंद 
 • पुणे-सोलापूर आणि सोलापूर-पुणे बससेवा 48 तासांसाठी स्थगित करण्याचा झाला निर्णय 
 • सांगलीसह अन्य भागातून येणाऱ्या बस सांगोल्याहूनच परत फिरणार; सोलापूर स्थानकावरील बस पुणे, पंढरपूरकडे धावणार नाहीत 
 • सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी प्रवाशांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने सुरु केले नियोजन 

कोरोनाच्या वैश्‍विक संकटामुळे 23 मार्चपासून बंद असलेली प्रवासी वाहतूक राज्य परिवहन महामंडळाने काही दिवसांपूर्वीच सुरु केली आहे. महामंडळाचा संचित तोटा वाढू लागल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पैसे नाहीत, अशी आवस्था झाली. त्यामुळे पगारीसाठी महामंडळाला राज्य सरकारकडे हात पसरवावे लागत आहेत. तत्पूर्वी, ऊस आंदोलन असो की अन्य कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात महामंडळाच्या बसेसला टार्गेट केले जाते, हा अनुभव जुनाच आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी होणाऱ्या आंदोलनात असा प्रकार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे महामंडळाने आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बस वाहतूक रविवारी (ता. 30) रात्री 12 ते सोमवारी (ता. 31) रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवावी, असे पत्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विभाग नियंत्रकांना दिले आहे. 
 
पंढरपूरची बससेवा 48 तास राहणार बंद 
वंचित बहूजन आघाडीसह वारकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे पत्र मिळाले आहे. त्यानुसार बस वाहतूक बंद करण्याचे नियोजन केले जात आहे. पंढरपूर-सोलापूर, सोलापूर-पंढरपूर, पुणे-पंढरपूर अशी वाहतूक बंद राहील.
- रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, सोलापूर