Pandharpur Vitthal Temple Dress Code
esakal
कोट्यवधी वारकरी आणि विठ्ठलभक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आता परदेशी भाविकांसाठी विशेष नियम लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी परदेशातून येणाऱ्या भक्तांनी भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेला साजेसा पोशाख परिधान करावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे. यासाठी मंदिर प्रशासनाकडून वस्त्रसंहिता तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या नियमांचं पालन करणाऱ्या परदेशी भक्तांना दर्शनासाठी थेट प्रवेश देण्याचा प्रस्तावही समोर आला आहे.