
Beed OBC Melava: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचा हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करावा,या मागणीसाठी बीडमध्ये शुक्रवारी ओबीसी एल्गार मेळावा संपन्न झाला. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. मंचावर धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यासह ओबीसीतील समाजघटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.