'तुमच्या महाराष्ट्रात काय चाललयं, असं लोक मला विचारतात' | Pankaja Munde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde
'तुमच्या महाराष्ट्रात काय चाललयं, असं लोक मला विचारतात'

'तुमच्या महाराष्ट्रात काय चाललयं, असं लोक मला विचारतात'

मुंबई : तुमच्या महाराष्ट्रात काय चाललयं असं, लोक मला विचारतात, या शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. त्या मुंबईत भाजप (BJP) मुख्यालयात आज मंगळवारी (ता.२३) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होत्या. सत्तेत असणारे लोक अनुभवी आहेत. ओबीसींना अंधकारात लोटणारा निर्णय म्हणजे ओबीसींचे राजकीय आरक्षण (Obc Political Reservation) रद्द झाले, असे त्या म्हणाल्या. इम्पेरिकल डेटाची मागणी न्यायालयाकडून सातत्याने होत आहे. मात्र सरकारकडून दिले जात नाही. या सरकारला ओबीसी आरक्षण असुरक्षित करायचे का?आरक्षण संरक्षणासाठी अध्यादेश (Mumbai) काढण्याचे ढोंग सरकारने केले आहे.

हेही वाचा: शनिवारी लग्न अन् सोमवारी केली आत्महत्या, नवरदेवाचे टोकाचे पाऊल

या अध्यादेशाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रत्येक बलाढ्य नेत्यांच्या चुकीच्या कामांसाठी निधी आहे. पण मागासवर्गीय आयोगाला निधी उपलब्ध करुन दिलेला नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. प्रत्येक गोष्ट, निर्णय यासाठी केंद्राकडे बोट दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. आपल्याला इम्पेरिकल डेटाची व्याख्या माहीत आहे का?, असा सवाल पंकजा यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

loading image
go to top