गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावुक, 'आम्हाला भाऊ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde emotional brother gopinath munde memory

Pankaja Munde: गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावुक, 'आम्हाला भाऊ...

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावुक झाल्याचं पाहायला मिळाल्या. कुटुंबाला एकत्र ठेवणे हे भाग्य सर्वांच्या नशिबी नसते. माझ्या घरात कोणी मोठा भाऊ आहे का? आम्ही तिघी बहिणीच आहोत, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली. (pankaja munde emotional brother gopinath munde memory)

बीडच्या परळी शहरात नटराज रंगमंदिर इथं कार्यक्रम पार पडला. यावेळी पंकजा मुंडे भावुक झाल्याचे पाहायला मिळालं. 'आज मला बाबांचा चेहरा आपल्यात दिसला. बाबा म्हणायचे की, बेटा तुझ्या कार्यकर्त्यांना आतापासूनच टक्कल पडत आहे.

Sandeep Deshpande : मी घाबरणार नाही... हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंनी दिला इशारा

मात्र माझ्या कार्यकर्त्यांना भरपूर केस आहेत. आज जर ते असते तर ते म्हणाले असते की, आपलं वय जगाला कळेल असत म्हणून ते त्यांच्या मित्रांना असा अमृत अमृतमहोत्सव साजरा करण्यास दिला नसता, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आठवणींना उजाळा दिला.

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा अमृत महोत्सव घेता आला नाही. ती संधी अन् हे भाग्य आमच्या नशिबी नव्हते. आज सुद्धा माझे बाबा नाहीत हे दुःख पचवण मला खूप कठीण जाते तर त्यांच्या मित्रांनाही पचवणं कठीण होत पण आपल्या सगळ्याच्या सोबतीमुळे आम्ही एकमेकांना सहारा देत आलो.

बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

अचानकपणे बाबा आम्हाला सोडून गेले अन् माझ्या खांद्यावर परिवार सांभाळण्याचे खूप मोठं आव्हान होतं. माझे खांदे ओझ्याने झुकले होते पण सर्वांनी वाटून घेतलेल्या जबाबदारीमुळे मी आज मोकळेपणाने काम करत अशी भावनाही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Pankaja Munde