Pankaja Munde: "सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी"; पंकजा मुंडेंचं हाकेंसाठी सरकारला साकडं

प्रा. लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत, उपचारांना नकार दिल्यानं त्यांची प्रकृती खालावत आहे.
Pankaja Munde
Pankaja Mundeesakal
Updated on

मुंबई : मराठा सामाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी एकीकडं आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर त्यांच्या या मागमीविरोधात ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषण करत आहेत. हाके यांनी अन्न-पाणी सोडल्यानं तसेच उपचारांना नकार दिल्यानं त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. यापार्श्वभूमीवर सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी सरकारला केलं आहे. (Pankaja Munde gives support to OBC aggitator Lakshman Hake and apeal to maha govt)

पंकजा मुंडे यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. यात त्या म्हणतात, "प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत, त्यांनी पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे"

Pankaja Munde
VIP Culture End: आता मंत्र्यांना लाईट बिल स्वतःच्या खिशातून भरावं लागणार; 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय Video Viral

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यातच मनोज जरांगे यांनी पुन्हा एकाद मराठा आरक्षणावरुन उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. यापूर्वीही त्यांनी केलेल्या उपोषणाचा आणि सभांचा मोठा परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण आता ओबीसींच्या वोट बँकेच्या दृष्टीनं प्रा. हाके यांचं उपोषण महत्वाचं मानलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com