चिक्की गैरव्यवहारप्रकरणी पंकजा मुंडेना 'क्‍लीन चिट'

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

मुंबई : राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की गैरव्यवहारासंदर्भातील झालेल्या आरोपातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळले नसल्याचे सांगत क्‍लीन चिट दिली आहे.

मुंबई : राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की गैरव्यवहारासंदर्भातील झालेल्या आरोपातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या आरोपांमध्ये काहीही तथ्य आढळले नसल्याचे सांगत क्‍लीन चिट दिली आहे.

अपर पोलिस आयुक्त केशव पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ता सचिन सावंत यांना लिहिलेल्या पत्रात याबाबत खुलासा केला आहे. "महिला व बालकल्याण विभागाने केलेली नियमबाह्य खरेदी आणि त्यासंदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत आपण केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती आपण केलेल्या तक्रार अर्जावरील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही', असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

सावंत यांनी वर्षभरापूर्वी मुंडे यांच्यावर चिक्की गैरव्यवहारप्रकरणी आरोप केले करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. सावंत यांनी मुंडे यांच्यावर चिक्कीसह अन्य काही शालोपयोगी वस्तूंचे कंत्राट देताना गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. हा गैरव्यवहार तब्बल 206 कोटी रुपयांचा असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र, लाचलुचपत विभागाने केलेल्या चौकशीअंती या आरोपांमध्ये तथ्य नसल्याने मुंडे यांना क्‍लीन चिट देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde got Clear Chit