BRSचा मोठा डाव! पंकजांना आता जनतेच्या मनातील नव्हे, तर थेट CMपदाच्या उमेदवारीची 'ऑफर'

महाराष्ट्रात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांची तयारी आत्तापासूनच सुरु झाली आहे.
Pankaja Munde
Pankaja Munde

मुंबई : महाराष्ट्रात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण या निवडणुकांची तयारी आत्तापासूनच सुरु झाली आहे. तेलंगाणात सत्तेत असलेली मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष आता महाराष्ट्रात पाय रोवू पाहत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील अनेक नेते बीआरएसमध्ये दाखल होत आहेत. पण बीआरएसनं एक मोठी खेळी खेळली आहे. या पक्षानं मुख्यमंत्रीपदाचा चेहराही तयार केला आहे. (Pankaja Munde got lottery received offer of chief ministership from BRS)

Pankaja Munde
Patna Meeting: ऐक्याच्या पहिल्याच बैठकीनंतर विरोधक विखुरले! केजरीवालांचा काँग्रेससोबत जाण्यास नकार

पंकजा मुंडेंना ऑफर

बीआरएसनं मुख्यमंत्रीपदासाठी थेट भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ऑफर दिली आहे. आपल्याला भाजपमध्ये अनेकदा डावलण्यात आल्याची भावना पंकजा मुंडे यांच्यामध्ये आहे. तशी जाहीर नाराजी त्यांनी गोपिनाथ गडावर आपल्या भाषणात व्यक्त केली होती. यासाठी आपण अमित शहांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळं त्यांच्या या कथित नाराजीचाच फायदा बीआरएस करुन घेताना दिसतो आहे. (Latest Marathi News)

Pankaja Munde
Patna Meeting: "अजूनही वेळ गेलेली नाही लग्न करा, आम्ही..."; लालू प्रसाद यांचा सल्ला राहुल गांधी मानणार का?

का दिली ऑफर?

पंकजा मुंडेंच्या ऑफरबाबत सांगताना बीआरएसचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले, "गोपिनाथ मुंडे यांनी संपूर्ण देशभरात भाजप रुजवण्याचं काम केलं. पण त्यांच्या मुलीवरच आज भाजपत अन्याय होत आहे. त्यामुळं पंकजा मुंडेंना बीआरएसमध्ये घेण्यासाठी आम्ही अध्यक्ष केसीआर यांच्याशी चर्चा करु. केसीआर त्यांना नक्कीच मुख्यंमत्रीपदाचा चेहरा बनवतील"

Pankaja Munde
Patna Meeting: विरोधकांची बैठक संपली; नितीश कुमारांनी सांगितली पुढची रणनीती

पंकजांनी अद्याप प्रतिक्रिया नाही

दरम्यान, पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपदासाठी ही मोठी ऑफर मिळाली असली तरी यावर अद्याप मुंडे यांच्याकडून कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाही. पण त्या या ऑफरकडे कशा प्रकारे पाहतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. (Marathi Tajya Batmya)

राजू शेट्टींनी नाकारली ऑफर

बीआरएस हा शेतकऱ्यांचा पक्ष असल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी ग्रामीण भागातील नेत्यांना पक्षामध्ये घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना देखील बीआरएसनं प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर देऊ केली होती, पण त्यांनी ही ऑफर नाकारली. गेल्या काही दिवसांत बीआरएसनं छ्त्रपती संभाजी नगर आणि नांदेड इथं जाहीर सभा घेतली यामध्ये स्वतः केसीआर यांनी महाराष्ट्रातील प्रश्नांवर बीआरएस कशापद्धतीनं काम करु इच्छितं याची माहिती दिली होती.

Pankaja Munde
Patna Meeting: विरोधकांच्या बैठकीत ठरला कार्यक्रम; 'असा' असणार किमान समान कार्यक्रम!

बावनकुळेंच्या भाच्याचा बीआरएसमध्ये प्रवेश

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाचे जयकुमार बेलाखडे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला असून आपल्या मामावर अर्थात बावनकुळेंवर त्यांनी 'कंस मामा' असं म्हणत कडवट टीकाही केली होती.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगिरथ भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. २७ जून रोजी आषाढी एकादशीला त्यांचा जाहीर प्रवेश होईल असं सांगितलं जात आहे. कारण या एकादशीला केसीआर स्वतः पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com