'परळी सुन्न', करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेंची सूचक प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde

'परळी सुन्न', करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयानं करुणा शर्मा यांना अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल गौप्यस्फोट करण्यासाठी करुणा शर्मा परळीत पत्रकार परिषद घेणार होत्या. त्याआधी परळीत एका व्यक्तीवर चाकू हल्ल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आता यावर पंकजा मुंडे यांनी ट्विटवरून सूचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर म्हटले की, अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये. wrong president should not be set!ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: ईडीच्या कारवाया म्हणजे राज्याच्या अधिकारावर गदा - शरद पवार

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात अनेक गोष्टी पुराव्यानिशी उघड करणार असे फेसबुक लाइव्हमधून सांगितले होते. परळीत त्यांनी पत्रकार परिषदेत या गोष्टी उघड करू असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, आपल्याला जिवंत जाळण्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. यासाठी परळीत जाण्याआधीच त्यांना अठक करण्यात आली. त्यांच्या गाडीत पिस्तुलही सापडले होते.

Web Title: Pankaja Munde Reaction On Karuna Sharma Arrest Parali

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..