esakal | दोन वर्षात अनेक गोष्टी घडल्या त्याबाबत बोलायचे आहे - पंकजा मुंडे | Pankaja munde
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Kakade slams Pankaja Munde in Pune

दोन वर्षात अनेक गोष्टी घडल्या त्याबाबत बोलायचे आहे - पंकजा मुंडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja munde) भगवान गडावरुन दसरा मेळाव्याला (dussehra rally) संबोधित करणार आहेत. त्यांनी समर्थकांना दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मागच्यावर्षी कोरोनामुळे पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याला ऑनलाइन मार्गदर्शन केले होते.

"मला आपल्याशी खूप बोलायचं आहे. दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत. तुमचं ऐकायचं आहे आणि मलाही बोलायचं आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी इथे अनेक संकल्प केले व तडीस नेले. असेच संकल्प करण्यासाठी आपण दरवर्षी इथे जमतो. ही एक ऊर्जा, शक्ती आणि अभिमान आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा: 'पदावर रावणाची ‘शुर्पणखा’ नको'; चित्रा वाघ यांचं चाकणकरांच्या नियुक्तीबाबत खोचक ट्विट

"आपण तिथे मोठ्या संख्येने येणार आहात. मला खूप काही बोलायचं आहे. दोनवर्षात अनेक घटना घडल्या आहेत. अनेक संघर्ष आहेत. यश-अपयश आहे. इथून कुठली उमेद घ्यायची, भविष्याची आखणी कशी करायची, आपल्याशी खूप बोलायचं आहे. या दोन वर्षात अनेक गोष्टी घडल्या आहेत. मी काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मी जे बोलते, ते स्वयंप्रेरणने बोलते" असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

loading image
go to top