मला कुठलेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत - परमबिर सिंह

parambir singh
parambir singhesakal

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) गेल्या कित्येक दिवसांपासून गायब आहेत. न्यायालयात देखील सुनावणीसाठी ते येत नसल्यामुळे आणि तपास यंत्रणांसमोर चौकशीसाठी हजर होत नसल्यामुळे ते फरार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर सुनावणी सुरू असताना त्यांच्या वकिलांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. नेमकं काय म्हणाले परमबीर सिंग त्यांच्या प्रतिज्ञापत्रात...

नेमकं काय म्हटलंय परमबीर सिंग यांच्या प्रतिज्ञापत्रात..

आयोगासमोर काल परमवीर सिंग यांनी वकीला द्वारे शपथपत्र सादर केले आहे.

मी माझी तक्रार मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेली आहे. आता त्या संदर्भात मला कुठलेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत वा उलटतपासणीही करायची नाही असे शपथपत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी न्या.कैलाश चांदीवाल आयोगासमोर मुखत्यारमार्फत पॉवर ऑफ ॲटर्नी दिले. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले होते असा आरोप करणारे पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २० मार्च २०२१ रोजी दिले होते. त्या पत्राची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चांदीवाल आयोग स्थापन केला. या आयोगासमोर सिंग यांनी पॉवर ऑफ ॲटर्नी दिलेले महेश पांचाल यांनी शुक्रवारी शपथपत्र सादर केले. परमबीर यांच्या वतीने या शपथपत्रात अशी भूमिका मांडण्यात आली आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिलेली होती तसेच सर्वोच्च न्यायालयासही त्याबाबत अवगत केलेले आहे. तब्येतीच्या कारणामुळे स्वत: आयोगासमोर हजर राहू शकत नाही असेही स्पष्ट करण्यात आले. आता त्या पत्रासंदर्भात त्यांना कोणतेही साक्षी-पुरावे द्यायचे नाहीत तपासणी वा उलटतपासणीही करायची नाही. चांदीवाल आयोगाने यापूर्वी परमबीर सिंग यांना हजर राहण्यासंदर्भात दोन वेळा जामीनपात्र वॉरन्ट काढला होता.

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रार तर दिली पण ते स्वत: आयोगासमोर साक्षीसाठी तर येतच नाहीत शिवाय आता त्यांना साक्षी-पुरावे द्यायचेच नसल्याची भूमिका घेत आहेत याकडे देशमुख यांच्या वकिलांनी न्या.कैलाश चांदीवाल यांचे लक्ष वेधले. त्यावर आपलेही अशील अनिल देशमुख आजवर आयोगासमोर आलेले नाहीत याचे भान ठेवून बोला अशी समज न्या.चांदीवाल यांनी देशमुख यांच्या वकिलास दिली.

parambir singh
"जनाब राऊत..तेव्हा हाताला काय लकवा मारतो काय?"

परमबीर सिंह यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांनंतर त्यांच्या विरोधात देखील अनेक आरोप झाले आहेत. यासंदर्भात निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चंडीवाल यांच्या आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीसाठी सातत्याने विचारणा करून देखील परमबीर सिंह उपस्थित राहिले नसल्यामुळे ते नेमके कुठे आहेत? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात तपास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती चंडीवाल आयोगाची स्थापना केली आहे. याच आयोगासमोर सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

parambir singh
वसई शिवसेनेत खळबळ, १५० पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com