CBI चौकशीमुळे उंदीर सैरावैरा धावू लागलेत; चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र l Chandrakant Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil,Uddhav Thackeray

CBI चौकशीमुळे उंदीर सैरावैरा धावू लागलेत- चंद्रकांत पाटील

राज्यातल्या मविआ सरकारवर चहूबाजूंनी संकंट येत आहेत. ED आणि अन्य केंद्रीय यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करून यांना काही साध्य झालं नाही. आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मागणीनुसार त्यांच्यावरील खटल्यांचा तपास CBI ने करावा असा आदेशच सुप्रीम कोर्टानं दिलायं किती ही नाचक्की! अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आघाडी सरकारवर केली आहे.

हेही वाचा: ...नाहीतर मंत्र्यांच्या दालनात उपोषणाला बसणार; निलेश लंकेचा इशारा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) देण्याचा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयनं (Supreme Court) महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) मोठा झटका दिला. न्यायालयाच्या या निर्णयाने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.

हेही वाचा: अजित पवारांनी घेतली दरेकरांची फिरकी; म्हणाले,गुस्सा क्यू आता है...

आघाडीवर निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कोर्टात जाऊन थपडा खायच्या, नाचक्की करून घ्यायची ही सरकारची आता सवयच झालेली आहे. सत्तेसाठी केलेल्या तडजोडींचं फळ आता शिवसेनेला भोगावं लागणार आहे. अर्थात, परमबीर सिंगांच्या CBI चौकशीमुळे जहाज बुडण्याच्या भीतीनं बरेच उंदीर सैरावैरा धावू लागले, तरी आश्चर्य वाटायला नको! असेही ते म्हणाले.

Web Title: Parambir Singh Case Chandrakant Patil React And Criticism Thackeray Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top