अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याच्या मागणीसाठी परमबीर सिंह यांची न्यायालयात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parambir Singh

अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याच्या मागणीसाठी परमबीर सिंह यांची न्यायालयात धाव

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध असलेला गुन्हेगारीचा आदेश रद्द करण्यासाठी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या आठवड्यात त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.

हेही वाचा: परमबीर सिंह भारतातच, ४८ तासांत CBI समोर होणार हजर

बिल्डर सह बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. तसेच न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. आता हे वॉरंट रद्द करण्यात यावे या मागणीसाठी परमबीर सिंह यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेले वाहन सापडल्यानंतर सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मार्च महिन्यात मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. तसेच अनेकांनी पुढे येत परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. याचप्रकरणी त्यांची चौकशी सुरू असताना परमबीर सिंह अचानक गायब झाले होते. त्यानंतर काल त्यांनी मुंबईत हजेरी लावली. परमबीर सिंह यांची खंडणीच्या आरोप प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी सहा तास चौकशी केली. तसेच जेव्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल तेव्हा हजर राहावे लागेल, अशी नोटीस त्यांना तपास यंत्रणेने बजावण्यात आली आहे.

loading image
go to top