Parbhani Loksabha 2024 : पंजाब डख यांना 'वंचित'कडून उमेदवारी; प्रकाश आंबेडकरांनी उमेदवार का बदलला?

पंजाब डख हे मागच्या अनेक वर्षांपासून हवामानाचा अंदाज व्यक्त करतात. कधी, कुठे आणि किती पाऊस पडेल याचा नेमका अंदाज ते व्यक्त करत असल्याने राज्यभर त्यांची ख्याती आहे. त्यांच्या अंदाजांमुळे आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं होणारं नुकसान टळलेलं आहे.
Parbhani Loksabha 2024
Parbhani Loksabha 2024esakal

Punjab Dakh : परभणी लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार बदलला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार प्रकाश आंबेडकरांनी हवामान अभ्यासक पंजाब डख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

परभणी लोकसभा मतदारसंगातून ठाकरे गटाने संजय जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीकडून महादेव जानकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीला बाळासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली होती.

बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी परभणीचा उमेदवार बदलला आहे. बाळासाहेब उगले यांची उमेदवारी रद्द करुन हवामान विषयाचे अभ्यासक पंजाब डख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Parbhani Loksabha 2024
Lok Sabha Election 2024: भाजपला 'या' जागेवर अजूनही का देता आला नाही उमेदवार?, PM मोदी स्वत: घेणार निर्णय

पंजाब डख हे मागच्या अनेक वर्षांपासून हवामानाचा अंदाज व्यक्त करतात. कधी, कुठे आणि किती पाऊस पडेल याचा नेमका अंदाज ते व्यक्त करत असल्याने राज्यभर त्यांची ख्याती आहे. त्यांच्या अंदाजांमुळे आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं होणारं नुकसान टळलेलं आहे.

पंजाब डख यांची क्रेझ बघता वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर बोलताना डख म्हणाले की, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे मी आभार मानतो. जसा वातावरणात बदल होतो, तसा आता मतांमध्येही होणार आहे. परभणीत मतदानाचा पाऊस पडेल.

Parbhani Loksabha 2024
Share Market Closing: RBIच्या धोरणापूर्वी बाजारात तुफान तेजी; शेअर बाजार नवीन उच्चांकावर, कोणते शेअर्स वधारले?

पंजाब डख पुढे म्हणाले की, मी इथून बसल्या-बसल्या जगातल्या कुठलाही पाऊस सांगू शकतो. परभणीत मतांचा पाऊस पडणार का नाही, याचाही अंदाज घेतलेला आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, असं ते मीडियाशी बोलताना म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com