पालकांनो, तुम्हाला ‘हे’ पारंपारिक खेळ माहिती आहेत का? मुलांची एकाग्रता, सांघिक भावना, नेतृत्व गुण वाढविणारे खेळ, नक्की वाचा

अडीच हजार वर्षांपूर्वी खेळला जाणारा विट्टी-दांडू हा खेळरोमांचक आहे. भोवरा, खोखो, कांदा फोडी, या पारंपारिक खेळांमुळे तरुण-तरूणींसह महिला व पुरूषांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. या खेळांमुळे मनाची एकाग्रता वाढते, जिंकण्याची जिद्द, चिकाटी निर्माण होते.
vitti-dandu
vitti-dandusakal

सोलापूर : अडीच हजार वर्षांपूर्वी खेळला जाणारा विट्टी-दांडू हा खेळ खूपच रोमांचक आहे. भोवरा, खो खो, कांदा फोडी, या पारंपारिक खेळांमुळे तरुण-तरूणींसह महिला व पुरूषांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. या खेळांमुळे मनाची एकाग्रता वाढते, जिंकण्याची जिद्द, चिकाटी निर्माण होते. सोशल मिडियाच्या जमान्यात प्रत्येक पालकांनी चिमुकल्यांचे बालपण आनंददायी करण्यासाठी या खेळांची कास धरून त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. जेणकरून मुले एकलकोंडी होणार नाहीत, असे तज्ज्ञांचे मत आहे.

१) भोवरा

भोवरा हा शंक्वाकाराचा असतो. त्यास सहसा लोखंडाचे एक निमुळते टोक असते. त्यास आरु असे म्हणतात. दोरी किंवा जाळी गुंडाळण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून त्यास विशेष प्रकारची सोय केलेली असते. दोरी त्याच्या सभोवती गुंडाळून, त्याचे गाठ मारलेले एक टोक हातात धरुन तो जमिनीवर झटक्याने फेकला जातो व फिरवला जातो. हा खेळ भारत तसेच चीन व जपानमध्येही खेळला जातो. विशेषतः पावसाळ्यात हा खेळ रंगतो. चिंधकाने बोटे बांधून गरागरा भोवरे फिरवतात. ज्याच्यावर डाव येईल, त्याचा भोवरा रिंगणात मांडतात आणि बाकीचे खेळाडू त्या भोवऱ्याला गुच्चे मारतात.

२) खो-खो

खो-खो खेळ प्रकारामध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु, एका वेळेस ९ खेळाडू खेळतात. दोन भागातील या खेळात पाच मिनिटांची विश्रांती असते. संपूर्ण खेळ साधारणतः ३७ मिनिटे चालतो. सुरवातीला पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनांत आळी-पाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो. बचाव करणाऱ्या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. पाठलाग करणाऱ्या सघांचा नववा खेळाडू बचाव करणाऱ्या संघाच्या तीन खेळाडूंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. एकदा एका खांबाकडील दिशा पकडल्यावर तो आपली दिशा बदलू शकत नाही. खांबाला स्पर्श करून तो आपली दिशा बदलू शकतो.

३) कांदा फोडी

या खेळात ज्याच्यावर राज्य आहे, तो खाली पाय पसरून बसतो आणि बाकीचे खेळाडू त्याचा पाय ओलांडून जातात. या खेळाच्या दुसऱ्या फेरीत राज्य असलेला एकावर एक पाय ठेवून बसतो. खेळ सुरू झाल्यावर राज्य असलेला पाय लांबवून त्यावर एका हाताची करंगळी धरतो आणि हात सरळ ठेवतो. उर्वरित खेळाडू ते ओलांडून जातात. बसलेला खेळाडू एका करंगळीवर दुसरी करंगळी ठेवतो, खेळाडू त्याला ओलांडतात. पण, जेव्हा हात-पाय एकावर एक धरून तो मनोरा उंचावला जातो, तेव्हा खरी मजा येते. उडी मारणाऱ्याच्या हात किंवा पायाचा स्पर्श झाल्यास तो बाद होतो. हाता-पायाच्या वेगवेगळ्या अवस्था झाल्यावर राज्य असलेला हाताने पायाचे अंगठे पकडून वाकून राहतो. फक्त, यावेळीच खेळाडूंनी त्याला उडी मारताना हात लावला तर चालतो. सरतेशेवटी राज्य असलेला उभाच राहतो, त्या वेळी त्याला ओलांडून जाणे कोणालाच शक्य नसते.

४) विट्टी- दांडू

विट्टी दांडू हा भारतीय उपखंडातील अडीच हजार वर्षांपूर्वीचा पारंपारिक खेळ आहे. या खेळात दोन काठ्या लागतात. लहान, अंडाकृती आकाराच्या लाकडी तुकड्याला ‘विट्टी’ तर लांब भागाला ‘दांडू’ म्हणतात. विट्टी वरच्या टोकाला मारण्यासाठी खेळाडूला दांड्याचा वापर करावा लागतो. ते हवेत असताना, खेळाडू शक्यतो गिलीला दूर जाईल असा फटका मारतो. त्यानंतर खेळाडूला प्रतिस्पर्ध्याने गिली घेण्यापूर्वी वर्तुळाच्या बाहेर एका बिंदूला धावणे आणि स्पर्श करणे आवश्यक आहे. हा खेळ जिंकण्याचं रहस्य हे सगळं विट्टी उठवण्याच्या आणि मारण्याच्या तंत्रात आहे.

पारंपारिक खेळातून शारीरिक व सामाजिक संस्कार

पारंपारिक खेळांमुळे मुलांना सामाजिक बांधिलकीचे भान होते. सहानुभूतीचा विकास होतो. शिकण्याचे कौशल्य वाढण्यास मदत होते. फुफ्फुस निरोगी राहते. एकाग्रता वाढून ध्येय्यावर लक्ष केंद्रित करण्याची शिकवण मिळते. सांघिक भावना वाढीस लागते व नेतृत्वगुण देखील तयार होतात. त्यासोबतच शरीराच्या सर्वच भागांची हालचाल होत असल्याने शारीरिक समस्या निर्माण होत नाहीत, असा विश्वास शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विणा जावळे यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com