पालकांनो, लहान मुलांची काळजी घ्या..! सोलापूर शहरात दररोज ४५ जणांना चावताहेत भटकी कुत्री, ५५ दिवसांत २,४८९ जणांना कुत्रे चावल्याची नोंद, वाचा....

सोलापूर शहरातील भटकी कुत्री मागील ५५ दिवसांत तब्बल २ हजार ४८९ नागरिकांना (दररोज सरासरी ४५ जणांना) कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. चार दिवसांपूर्वीच घोंगडे वस्तीतील नऊ वर्षीय समर्थ योगीनाथ स्वामी याचा रेबीजची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला होता.
dogs

dogs

solapur

Updated on

सोलापूर : सोलापूर शहरातील भटकी कुत्री मागील ५५ दिवसांत तब्बल २ हजार ४८९ नागरिकांना (दररोज सरासरी ४५ जणांना) कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे झाली आहे. चार दिवसांपूर्वीच घोंगडे वस्तीतील नऊ वर्षीय समर्थ योगीनाथ स्वामी याचा रेबीजची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यातच भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेली आकडेवारी समोर आल्याने शहरातील भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रणाची आवश्यकता असल्याची बाब अधोरेखित झाली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, जून महिन्यात सुमारे दोन हजार, तर १ ते २५ जुलैदरम्यान आणखी ४८९ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. अवघ्या ५५ दिवसांत चावा घेतलेल्या नागरिकांची संख्या अडीच हजारांपंर्यंत आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रणाचे मोठे आव्हान महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे.

भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, निर्बिजीकरणासाठी अपुरा निधी, तसेच प्राण्यांबाबतच्या विद्यमान धोरणांतील मर्यादेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांमुळे दिवस की रात्र, त्याठिकाणी बाहेरील व्यक्तीला जाणे देखील भीतीदायक बनले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

अशी घ्यावी खबरदारी....

  • कुत्रा चावल्यासच नव्हे, तर भटक्या कुत्र्याने चाटल्यास, नखाने ओरबाडल्यास किंवा त्वचेवर कोणतीही जखम झाल्यासही तातडीने रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी.

  • कुत्रा किंवा मांजरामुळे जखम झाल्यास ती त्वरित साबण आणि स्वच्छ वाहत्या पाण्याने किमान १५ मिनिटे धुवावी.

  • कुत्रा चावला किंवा कुत्र्याने जखम चाटल्यास संबंधिताने रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे.

    भटक्या कुत्र्यांपासून सुरक्षित अंतर राखून अनावश्यक संपर्क टाळावे, भटकी कुत्री घोळक्याने असल्यास त्यांना हाकलण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये.

कुत्र्यांच्या उपद्रवावर नियंत्रणाची गरज

घोंगडे वस्तीतील नऊ वर्षीय समर्थचा रेबीजची लागण होऊन चार दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. कुटुंबाने आपला एकुलता एक मुलगा गमावला. खबरदारीचा उपाय म्हणून मुलाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीय, शेजारील व शाळेतील त्याच्या मित्रांना आणि रुग्णालयातील परिचारिकांनाही अँटी-रेबीज लसी देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्यावर नियंत्रणाची गरज या घटनेनंतर अधोरेखित झाली आहे. महापालिका दरवर्षी कुत्र्यांच्या लसीकरणासाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च करत असली, तरी वाढत्या घटनांमुळे अधिक व्यापकपणे उपाययोजनांची आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com