
'ज्यांनी तुरुंगात माझा छळ केला, तुरुंगात जे काही घडलं ते सगळं मी समितीसमोर मांडणार'
खासदार राणांचा मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांना इशारा
मागील काही दिवसांपूर्वी हनुमान चालीसा पठणावरून राणा दाम्पत्याने आक्रमक भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या खासगी निवासस्थानी हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर राणा दाम्पत्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली होती. दरम्यान, तुरुंगात असताना पोलिसांनी मला त्रास दिला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. याच तक्रारीबाबत म्हणणं मांडण्यासाठी आज खासदार राणा या संसदीय अधिकार समितीसमोर हजेरी लावणार आहेत. यांसदर्भात त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. (Navneet Rana News)
हेही वाचा: राऊतांविरोधात सोमय्या दाम्पत्याकडून १०० कोटीचा दावा दाखल
खासदार राणा म्हणाल्या, ज्यांनी तुरुंगात माझा छळ केला आणि माझ्यासोबत तुरुंगात जे काही घडलं ते सगळं मी समितीसमोर मांडणार आहे. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यासह ज्या ज्या विभागातील अधिकाऱ्यांनी मला त्रास दिला त्यांचा जबाब नोंदवावा, अशी विनंती मी करणार आहे, असं म्हणत त्यांनी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, माझ्यावर जो अत्याचार झाला, तसा अत्याचार इतर कोणावर होऊ नये, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसंच लोकसभा सदस्य म्हणून मला जो अधिकार आहे त्याचा मी वापर करणार आहे. संविधानाचा खून करत माझ्यावर अत्याचार करण्यात आला. याबाबत आदेश देणाऱ्यांनाही आता उत्तर द्यावं लागणार आहे,' असंही नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं आहे. आत त्यांच्या या तक्रारीनंतर संसदीय अधिकार समितीकडून कोणती पावलं उचलली जातात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा: राजधानी दिल्लीत मुसळधार; सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडली
Web Title: Parliament Committee Navneet Rana Complaint Against Mumbai Police Officers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..