
राऊतांविरोधात सोमय्या दाम्पत्याची हायकोर्टात धाव, राऊतांच्या अडणचणीत वाढ होण्याची शक्यता
राऊतांविरोधात सोमय्या दाम्पत्याकडून १०० कोटीचा दावा दाखल
मागील काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यात घोटाळे उघड करण्यावरून संघर्ष सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांविरोधात उच्च न्यायालयात १०० कोटीचा आब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. राऊतांविरोधात सोमय्या दाम्पत्याने हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे आता राऊतांच्या अडणचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut vs Kirit Somaiya)
हेही वाचा: अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांचं सावट, ..अन्यथा गंभीर परिणाम होतील
भाजपाचे किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. १०० कोटींचा शौचालय घोटाळा काय असतो हे आता मुख्यमंत्री ठाकरेंना समजेल असे सोमय्या म्हणाले आहेत. खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे प्रवक्ते असून त्यांनी माफी कशी मागावी याची तयार करावी. कारण मेधा किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर १०० कोटीचा आब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. आता त्यांना किती शिक्षा होणार हे न्यायालय ठरवणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.
पुढे ते म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेला केवळ उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची माफी हवी आहे. त्यांनी माफीयागिरी करुन अनेक भ्रष्टाचार केले आहेत. एका नेव्ही ऑफीसरला मारहाण, मनसूख हिरेनची हत्या, हिरामणीचे त्याच्या परिवारासमोर मुंडण करणे, अशी दादागिरी त्यांच्या गुडांनी केली आहे. लोकांना धमक्या देणे, जीवेमारण्याचं काम करणे या सगळ्यामुळं एकदा तरी यांना धडा शिकवायचा होता, आता न्यायालया योग्य तो निर्णय घेईल असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील याचिका वकील अमित शहा यांनी न्यायालयात दाखल केली असून जुन महिण्यात यावर सुनावणी सुरु होईल, असंही सोमय्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा: राजधानी दिल्लीत मुसळधार; सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे पडली
Web Title: Somaiya Couple Files Defamation Against Sanjay Raut In High Court Rupees 100 Crore
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..