
पारनेर : तालुक्यात यंदा प्रथमच एप्रिल व मे महिन्यातही चांगला पाऊस झाला आहे. तसेच त्या नंतरही जून महिन्यातही चांगला पाऊस झाला आहे. तालुक्यात आज अखेर 427 मिलीमिटर पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यात खरीपाची 91हजार 409 हेक्टर क्षेत्रावर अतीशय मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे.