काँग्रेसच्या डाऊनफॉलचं विधान, परिपक्वतेवरून आजोबा पवारांनी पार्थचे टोचले कान; काँग्रेसनं म्हटलं, कृतघ्न मुलगा

Sharad Pawar on Parth Pawar दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू असल्याचं विधान केल्यानं नवा वाद निर्माण झालाय. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना नातवाचे कान टोचलेत.
Sharad Pawar Reacts to Grandson Statement

Sharad Pawar Reacts to Grandson Statement

Esakal

Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय असं विधान केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. बारामती पोट निवडणुकीत बिनविरोधची विनंती केल्यानंतरही सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसनं उमेदवार मैदानात उतरवलाय. याच मुद्द्यावर पार्थ पवार यांनी नाराजी व्यक्त करत विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, काँग्रेसनं उमेदवार उतरवणं म्हणजे त्यांच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात आहे. दरम्यान, या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी पार्थ पवार यांचे कान टोचलेत. Congress Hits Back After Parth Pawar Comment

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com