

MPSC Success Story Parvez Mulani From Ambawade Secures Assistant Town Planner Post in Ichalkaranji After IIT Madras Education
esakal
सातारा : जिद्द, मेहनत आणि उच्च शिक्षणाच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवू शकतात, हे अंबवडे (ता. खटाव) येथील परवेज रफिक मुलाणी यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करत त्यांची इचलकरंजी येथे सहाय्यक नगर रचनाकार (Assistant Town Planner) पदावर नियुक्ती झाली आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्यांना ही संधी मिळाली असून, त्यांच्या यशामुळे अंबवडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.