Pasha Patel faces criticism after his controversial statement on farmers suffering crop loss due to heavy rainfall in Maharashtra.
Pasha Patel faces criticism after his controversial statement on farmers suffering crop loss due to heavy rainfall in Maharashtra.esakal

Pasha Patel statement : ‘’... त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार’’; अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल अन् पाशा पटेलांचं वादग्रस्त विधान!

Pasha Patel controversial statement on farmers: ‘’३६५ पैकी ३२२ दिवस शेतकऱ्यांसाठी संकटाचे असणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष’’ असंही पाशा पटेल यांनी म्हटलेलं आहे.
Published on

Pasha Patel’s Remark on Farmers After Heavy Rain : अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यभरात लाखो हेक्टरवरील शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे. हाताशी आलेला पीक डोळ्या देखत वाहून गेल्याने शेतकरी आता हवालदिल झालेला आहे. अशापरिस्थितीत आता नुकसानभरपाईसाठी तो सरकारकडे अपेक्षेने बघतोय. तर सरकारकडून पंचनाम्यांना सुरूवात केली गेली आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं एक वादग्रस्त विधान समोर आलं आहे. ज्यावरून विरोधक आता सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर धारशीव येथे मीडियाला प्रतिक्रिया देताना, पाशा पटेल म्हणाले निसर्गाचं नुकसान केलं, ते आता भोगावं लागणार. शेतकऱ्यांनी नुकसानाची सवय करून घ्यावी. तसेच, आता ज्या पद्धतीने या पावसामुळे शेतकऱ्यांचं जेवढं काही नुकसान झालेलं आहे, तेवढी भरपाई करण्याची क्षमता कुणाची असू शकत नाही. आपण सरकारच्यावतीने नुकसानभरपाई देत नाही, तर आपण मदत करू शकतो.

याशिवाय, ‘’पाशा पटेल म्हणाले, नुकसान जे झालेलं आहे तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही. आता जे तुम्हाला नुकसान दिसत आहे, याची आपल्याला आता सवय करून घ्यावी लागणार आहे. कारण, हे वारंवार घडणार आहे. कधी पाऊस जास्त पडून, कधी पाऊस कमी पडून, कधी पाऊस न पडून, कधी तापमान वाढल्याने, कधी गारपीट तर कधी थंडी वाढल्याने म्हणजे ३६५ दिवसांपैकी ३२२ दिवस हे शेतकऱ्यांना संकटाचे दिवस येणार आहेत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आपण एवढा प्रचंड निसर्गाचा नाश केलाय, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत.’’

Pasha Patel faces criticism after his controversial statement on farmers suffering crop loss due to heavy rainfall in Maharashtra.
Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

तसंच ‘’संकटं एवढी मोठी आहेत, या संकटात सर्वस्व झालेलं नुकसान कधीही भरून निघण्याची शक्यता नाही. तात्पुरतं उभं राहण्यापुरतं सरकार देवू शकतं,  संपूर्ण काही देवू शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.’’  पाशा पटेल यांनी बोलून दाखवलं आहे. त्यांच्या वक्तव्यावर आता विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com