Malegaon : रूग्णालयात नातेवाईकांचा धिंगाणा; खुर्च्यांसह कुंड्यांची तोडफोड, चार जणांविरुध्द गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malegaon Hospital

रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Malegaon : रूग्णालयात नातेवाईकांचा धिंगाणा; खुर्च्यांसह कुंड्यांची तोडफोड

मालेगाव येथील रुग्णालयात (Malegaon Hospital) काल (मंगळवार) रात्रीच्या सुमारास एका रुग्णाच्या 15 ते 20 नातेवाईकांनी धिंगाणा घातलाय. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की केली आहे. तसेच रुग्णालयातील खुर्च्या, कुंड्यांचीही तोडफोड केल्याचं समजतंय.

काल रात्रीच्या सुमारास हे नातेवाईक रुग्णाला भेटण्यासाठी आले होते. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी (Hospital Staff) त्यांना जास्त वेळ आयसीयू जवळ थांबू नका, असं सांगितलं. परंतु, याच क्षुल्लक कारणावरुन नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.

हेही वाचा: पाकिस्तानात चोरीप्रकरणी 4 जणींना केलं रस्त्यावर विवस्त्र

दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलिसांनी (Malegaon Police) ताब्यात घेतल्याचं समजतंय. सध्या रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण असल्याचं पहायला मिळतेय. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा: लसीकरणाचं बनावट सर्टिफिकेट लीक होण्याच्या भीतीनं पत्नीसह 3 मुलींची हत्या

Web Title: Patient Relatives Quarrel With Staff At Government Hospital In Malegaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..