राज्यातील रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत : मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 मार्च 2020

राज्यभर

  • चित्रपटांच्या चित्रीकरणालाही फटका
  • पुण्यात ३० जणांची चाचणी निगेटिव्ह
  • वैधमापन विभाग मास्कचा काळाबाजार रोखणार
  • अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर पोलिसांचे लक्ष
  • नागपूरमध्ये बाधितांचा युद्धपातळीवर शोध
  • कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
  • कर्नाटकमध्ये दहावी परीक्षेचे वेळापत्रक बदलले
  • नाशिकमध्ये पोल्ट्री व्यावसायिक शरद पवारांना भेटले
  • पंढरपूरमध्ये भाविकांची देशदर्शनाकडे पाठ
  • नगरमध्ये सार्वजनिक कार्यक्रम रद्द

मुंबई - राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ११ झाली असून, या सर्वांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, दक्षित कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या ७ देशांमधून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी प्रशासनाला दिल्या.

कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 

मोठी बातमी : कोरोनामुळं बदलले व्हिसाचे 'हे' नियम!

मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळांवर गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करून आले आहे, त्यांनी १४ दिवसांपर्यंत घरीच थांबावे. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण सुविधा तातडीने निर्माण करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा आढावा घ्यावा. टुर ऑपरेटर्सनी परदेशवारी केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी.’

या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी यावेळी उपस्थित होते.

‘त्या’ प्रवाशांना १०० टक्के विलगीकरण 
प्रशासनाला निर्देश देताना मुख्य सचिव अजोय मेहता म्हणाले, ‘चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशातून १५ फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे किंवा मायदेशी परतले आहेत, त्यांना सक्तीने १५ दिवस घरीच स्वतंत्र राहण्याच्या सूचना द्याव्यात. अशा प्रवाशांचे १०० टक्के विलगीकरण केले जाणार आहे. 

शासकीय कार्यक्रम रद्द करा
यात्रा, सामूदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा, लोकांना प्रशिक्षित करा, कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्या, शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकिंग न करण्याच्या सूचना द्या. सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक जागा येथे स्वच्छता ठेवा. सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा सूचना मुखमंत्री ठाकरे यांनी केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patients in the state do not have severe symptoms uddhav thackeray