इंटेरो व्हायरसमुळे वाढले डोळे आलेले रुग्ण! आरोग्य विभागाकडे रुग्णांची नोंदच नाही; घाबरू नका ‘ही’ लक्षणे आढळली की उपचार घ्या

शहर-जिल्ह्यात डोळे आलेले (इंटेरो व्हायरस) ६० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाने डोळे आलेल्या रुग्णांचे रिपोर्ट आरोग्य खात्याला दिले. तरीपण, शहर व जिल्ह्यात एकही रूग्ण नसल्याचे अधिकाऱ्यांच्या रिपोर्टमध्ये आहे, हे विशेष.
your eyes
your eyessakal

सोलापूर : शहर-जिल्ह्यात डोळे आलेले (इंटेरो व्हायरस) ६० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाने डोळे आलेल्या रुग्णांचे रिपोर्ट आरोग्य खात्याला दिले. तरीपण, शहर व जिल्ह्यात एकही रूग्ण नसल्याचे अधिकाऱ्यांच्या रिपोर्टमध्ये आहे, हे विशेष. सध्या जिल्ह्यातील सांगोला, मोहोळ, पंढरपूर, बार्शीसह इतर तालुक्यात देखील डोळे आलेले रूग्ण आढळत आहेत. दुसरीकडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये औषधे उपलब्ध नसल्याचीही वस्तुस्थिती आहे.

राज्यात पुणे, सोलापूरसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये डोळे येणाऱ्या रुग्णांची विशेषत: चिमुकल्यांची संख्या वाढू लागली आहे. ॲडिनो वायरसमुळे डोळे येतात. पण, आता इंटेरो व्हायरसमुळे ही साथ झपाट्याने पसरत आहे. सध्या राज्यात डोळे आलेले पाच हजारांहून अधिक रुग्ण आहेत. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे गोचिड तापाचेही रुग्ण आढळत आहेत.

डोळे येण्याची साथ वाढत असल्याने आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशासेविकांमार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याचे आदेश आरोग्य संचालकांनी दिले आहेत. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार असून एका व्यक्तीच्या संपर्कातून लगेचच तो आजार दुसऱ्याला होतो. शाळा, वसतिगृहे व अनाथालयात, अशी साथ आढळल्यास डोळे आलेल्यांना इतर मुलांपासून वेगळे ठेवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, एकमेकांच्या संपर्कातून रुग्ण वाढत असल्याने डोळे आलेल्यांनी डोळ्याला हात लावणे टाळावे, गर्दीत जाणे टाळावे व हाताची स्वच्छता ठेवावी आणि डोळ्याला चष्मा लावावा, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांना पुन्हा एकदा हाताची स्वच्छता अन्‌ गर्दीत न जाणे व कुटुंबातील सदस्यांपासून काही दिवस लांब राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

गावठी उपचार नको, कॉर्नियाला इजा होईल

डोळे आल्यावर खेड्यापाड्यावरील लोक सुती कापडाला हळद लावून डोळ्याला लावायला सांगतात. त्यामुळे डोळ्याची जळजळ बंद होऊन लवकर बरा होईल, असे सांगितले जाते. पण, डोळे आल्यावर नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने मेडिकलमधून किंवा शासकीय रुग्णालयातून औषधे घ्यावीत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. गावठी उपचार केल्यास त्या चिमुकल्यांच्या कॉर्नियाला इजा होऊन डोळा खराब होऊ शकतो, असा इशाराही आरोग्य विभागाने दिला आहे.

आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे म्हणतात...

  • - गोचिड ताप हा विशिष्ट किडा चावल्याने होतो. उष्ण व दमट वातावरण त्या किड्याला पोषक ठरते

  • - तो किडा चावल्यावर सहा ते २१ दिवसांत आजार होण्याची शक्यता असते

  • - थंडी, ताप येणे, डोकेदुखी, खोकला, अंगावर काळ्या रंगाचे मोठे पुरळ येऊन त्याठिकाणी काळा डाग पडतो

  • - लक्षणे असलेल्यांनी ताप अंगावर न काढता तत्काळ जवळील रुग्णालयातून उपचार घ्यावेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com