Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; पत्राचाळ प्रकरणात मोठी अपडेट

संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत
Patra Chawl Land Scam Case
Patra Chawl Land Scam Caseesakal
Updated on

पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राऊत आणि त्यांचे कुटुंबीय मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत असल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प आहेत. संजय राऊत आणि त्यांचं कुटुंबीय श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांच्या मालकीच्या दोन लक्झरी गाड्यांचा वापर करत होते. या प्रकरणाचा तपास करताना मुंबईसह अनेक ठिकाणी ईडीने छापेमारी केली. यावेळी पूर्व उपनगरातील रिअल इस्टेट डेव्हलपरच्या कार्यालयांवरही छापेमारी करण्यात आली.

Patra Chawl Land Scam Case
Sanjay Raut : आवाज दाबण्यासाठी माझ्याविरोधात गुन्हे; संजय राऊत

मुलुंडमधील श्रद्धा डेव्हलपर्सच्या कार्यालयातील कागदपत्रं आणि संगणकांची ईडीच्या पथकाने तपासणी केली. सुनील राऊत यांच्या मतदारसंघातील भांडूप, मुलुंड आणि विक्रोळीत श्रद्धा डेव्हलपर्सचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने बुधवारी अवनी इन्फ्रास्ट्रक्चरवरही छापेमारी केली. ही कंपनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि पत्रा चाळ प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांनी सुरु केली होती.

Patra Chawl Land Scam Case
Mohit Kamboj इतिहास सांगतो ते जिथे असतात तिथे मोठा घोळ सुरू असतो

संजय राऊत यांना १ ऑगस्टला अटक केल्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून आर्थर रोड जेलमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com