Sharad Pawar: पत्राचाळ प्रकरणी आव्हाडांची कबुली, शरद पवारांच्या उपस्थितीत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar: पत्राचाळ प्रकरणी आव्हाडांची कबुली, शरद पवारांच्या उपस्थितीत...

Sharad Pawar: पत्राचाळ प्रकरणी आव्हाडांची कबुली, शरद पवारांच्या उपस्थितीत...

गेल्या काही महिन्यांपासून पत्राचाळ प्रकरण हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. दरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव घेतलं आहे. यासर्वावर, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. त्यांनी देखील यासर्वावर भाष्य करत शरद पवारांच्या उपस्थितीत याप्रकरणी बैठक झाली असल्याची कबुली दिली. (Patra Chawl Scam Jitendra Awhad Sharad Pawar Sanjay Raut )

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात पत्राचाळ प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावरून भाजपने शरद पवारांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी होत असलेल्या आरोपांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी झालेल्या बैठकीसंदर्भात भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी 14 जानेवारी 2006 रोजी बैठक घेतली. या बैठकीत सर्व अधिकारी आणि संबंधित लोकं उपस्थित होते असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. पत्राचाळ प्रकरणी शरद पवारांनी बैठक घेतली यात नवल काय असा सवाल करत राज्यातील विविध प्रश्नी अनेक बैठका शरद पवार यांनी घेतल्या होत्या. चर्चा करुन संवाद साधणे आणि मध्य मार्ग काढणे हाच हेतू त्या बैठकीत होता.

राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे तत्कालीन गृहनिर्माण विभागाचे सचिव होते. त्यांनी या बैठकीचे इतिवृत्त असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सरकार निर्णय घेईल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांचा असतो. तेच या प्रकरणात झाले असल्याचे आव्हाड यांनी म्हटले.

नेमकं काय आहे प्रकरण?

पत्राचाळ प्रकरणामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी आहे. याच प्रकरणात आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.

पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, यासाठी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा उपस्थितीत होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचा आणि संजय राऊत यांचा काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भातखळकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Web Title: Patra Chawl Scam Jitendra Awhad Sharad Pawar Sanjay Raut

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..