esakal | पवारांच्या कन्हेर दौऱ्याने उंचावल्या भुवया 
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

नातेपुतेच्या सभेची जागी झाली आठवण 
2019 च्या लोकसभा निवडणूकीतील माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ पवार यांची नातेपुते येथे सभा झाली होती. तुम्ही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी करा, या तालुक्‍याचा आमदार म्हणून मी तुमचे प्रश्‍न सोडवेन, तुमच्या मदतीला धावून येईल असा विश्‍वास पवार यांनी जाहीर सभेत दिला होता. माढ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार शिंदे यांचा 85 हजार मतांनी पराभव झाला. या पराभवात माळशिस तालुक्‍याचा वाटा सर्वाधिक होता. माळशिरस तालुक्‍याने भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या निवडणूकीत 1 लाख 630 मतांचे मताधिक्‍य दिले होते. अवघ्या सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा अवघ्या 2 हजार 590 मतांनी पराभव करत भाजपचे राम सातपुते आमदार झाले. 

पवारांच्या कन्हेर दौऱ्याने उंचावल्या भुवया 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : खासदार शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतला अविस्मरणीय जिल्हा म्हणजे सोलापूर. कोरोनाच्या दहशतीत व संकटात अडकलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्याला दिलासा आणि दिशा देण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष पवार हे उद्या (रविवारी) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील अनेकांचे (विरोधकांसह) थेट पवार यांच्याशी संबंध आहेत. ते पवारांना कधी उघड भेटतात तर कधी छुप्या पध्दतीने. रविवारच्या दौऱ्यात माळशिरस तालुक्‍यातील कन्हेरची भेट सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरु लागली आहे. 

पवार बहुतांश गोष्टी बोलून दाखवत नाहीत. त्यांच्या देहबोलीतून आणि कृतीतून त्या समजून घ्याव्या लागतात. माळशिरस तालुक्‍यातील कन्हेर गावातील रमेश पाटील यांच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी पवारांची सांत्वनपर भेट हे कशाचे द्योतक आहे? याचीच कुजबुज आता जिल्ह्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. पवारांना खंबीरपणे साथ देणाऱ्या आणि पवारांनी अनेक वर्षे राजकीय ताकद दिलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा तालुका म्हणून माळशिरसची ओळख आहे. मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपचा झेंडा त्यांनी हाती घेतल्यानंतर पवार यांनी माळशिरस तालुक्‍यात विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. 

2009 ते 2014 या पंचवार्षिकमध्ये माढ्याचे खासदार आणि केंद्रातील कृषीमंत्री म्हणून पवार यांनी कामकाज पाहिले. या कालावधीतील दुष्काळ निवारणाचे नियोजन असो की अन्य कोणते संकट, ते हताळण्याची कार्यपद्धती माढा मतदार संघातील जनतेने जवळून अनुभवली आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना असताना व जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना पवारांचा माळशिरससह सोलापूरचा दौरा सध्या चर्चेचा विषय आहे.