पेंच, ताडोबा व्याघ्रप्रकल्प खुले; तब्बल १०५ दिवसांनंतर पर्यटकांची भेट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

निसर्ग पर्यटनाला नियमित जात असलो तरी आज मात्र, प्रथमच निसर्ग पर्यटनाला जाताना भीती वाटत होती, अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली. सर्वांसाठी सुरक्षित अंतर पाळणे अनिवार्य करण्यात आले  आहे.

नागपूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील टाळेबंदीमुळे तब्बल १०५ दिवस बंद असलेले पेंच, ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी उघडण्यात आले. 

पेंचमधील सुरेवाणी, नागलवाडी, कऱ्हांडला प्रवेशद्वारापैकी केवळ एकाच प्रवेशद्वारातून दोन वाहनांतून सहा पर्यटकांनी, तर ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील १३ प्रवेशद्वारापैकी दोन प्रवेशद्वारातून २२ निसर्गप्रेमींनी सफारी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

निसर्ग पर्यटनाला नियमित जात असलो तरी आज मात्र, प्रथमच निसर्ग पर्यटनाला जाताना भीती वाटत होती, अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली. सर्वांसाठी सुरक्षित अंतर पाळणे अनिवार्य करण्यात आले  आहे.

ताडोबात २२ पर्यटक 
बफर झोनमधील १३ प्रवेशद्वार यासाठी खुले करण्यात आली. यामध्ये आगरझरी, देवाळा, कोलारा, मदनापूर, शिरकाळा, पांगडी, अलिझंझा, नवेगाव, कसलाघाट, झरीपेठ, नवगाव आणि रामदेगी या प्रवेशद्वारांचा समावेश आहे. मात्र, आज सफारीला आगरझरी आणि कोलारा प्रवेशद्वार वगळता एकही प्रवेशद्वार पर्यटन न आल्याने उघडले नाही. या दोन प्रवेशद्वारातून केवळ पाच जीप आत गेल्या. त्यातही एक नागपूरचा पर्यटक वगळता सर्व पर्यटक हे चंद्रपूर जिल्ह्यातील होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pench, Tadoba Tiger Project open