स्कार्प बांधून ८ एसटी स्टँडवर दागिने चोरणारी 'ती' सापडत नव्हती, पण अखेर...सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी

जिल्ह्यातील विविध एसटी स्टँडवरील महिलांचे दागिने चोरणाऱ्या सराईत महिला गुन्हेगाराला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. तिच्याविरुद्ध आठ गुन्हे दाखल होते. पोलिसांनी तिच्या ताब्यातून साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
solapur rural police
solapur rural policesakal

सोलापूर : जिल्ह्यातील विविध एसटी स्टँडवरील महिलांचे दागिने चोरणाऱ्या सराईत महिला गुन्हेगाराला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. तिच्याविरुद्ध आठ गुन्हे दाखल होते. पोलिसांनी तिच्या ताब्यातून साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जिल्ह्यातील मोहोळ, बार्शी शहर, पंढरपूर शहर, टेंभुर्णी, अकलूज, अक्कलकोट उत्तर, कुर्डुवाडी येथील एसटी स्टॅण्डवरील आठ महिलांकडील दागिने त्या संशयित आरोपी महिलेने लंपास केले होते. नोव्हेबर २०२२ पासून तिने सोलापूर जिल्ह्यातील एस‌टी स्टॅण्डवरील महिलांना टार्गेट केले होते. एकापाठोपाठ आठ गुन्हे दाखल झाले, पण पोलिसांना त्या महिलेचा ठावठिकाणा लागत नव्हता.

तिच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी ९ जुलैला तिला अटक केली. तिच्याकडे कसून चौकशी केली, त्यावेळी तिने संपूर्ण हकिगत कथन केली. चोरलेला मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे, पोलिस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहायक पोलिस फौजदार श्रीकांत गायकवाड, नीलकंठ जाधवर, पोलिस हवालदार सलीम बागवान, हरिदास पांढरे, आबासाहेब मुंढे, विजय भरले, सुहास नारायणकर, मोहिनी भोगे, पोलिस नाईक रवी माने, पल्लवी इंगळे, ज्योती काळे, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, चालक दिलीप थोरात यांच्या पथकाने पार पाडली.

तोंडाला सतत स्कार्प, अन्‌ वेगवेगळ्या ठिकाणी चोरी

मूळची लातूरची असलेली ती महिला तोंडाला नेहमीच स्कार्प बांधून वेगवेगळ्या एसटी स्टॅण्डवरील महिलांना टार्गेट करायची. गर्दीतून एसटीत चढताना तर कधी सहप्रवासी म्हणूनही ती महिला दागिने चोरत होती. तोंडाला नेहमीच स्कार्प बांधून ती फिरत होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिचा चेहराही स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे तिला शोधणे कठीण झाले होते. पण, खबऱ्याच्या अचूक माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या पथकाने दिला जेरबंद केले.

नई जिंदगी परिसरातून अटक

मोहोळ एसटी स्टँड येथे दागिने चोरी केलेली महिला सोलापूर शहरातील नई जिंदगी येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली. तत्काळ पोलिसांनी सापळा लावून तिला पकडले. सुरवातीला तिने उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु, सखोल तपासाअंती मे महिन्यात मोहोळ एसटी स्टँडवरून बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याचे तिने कबूल केले. पोलिसांचा संशय बळावल्याने अधिक कौशल्यपूर्ण तपास केला. त्यावेळी आठ गुन्ह्यातील ती संशयित आरोपी असल्याचे समोर आले. सध्या ती मोहोळ पोलिसांच्या ताब्यात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com