MVA Morcha: मोर्चाला परवानगी नाकारलेली नाही, पण...; मविआचं महाराष्ट्रप्रेमींना आवाहन

मुंबईत १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीनं मोर्चाचं आयोजन केलं आहे.
ajit pawar
ajit pawaresakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, महापुरुषांचा अपमान तसेच बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यांवर मुंबईत महाविकास आघाडीच्यावतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. याच्या तयारीबाबत आज बैठक पार पडली. या बैठकीचा तपशील अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिला. (Permission to MVA Morcha has not been denied but MVA appeal to Maharashtra lovers)

ajit pawar
Maharashtra-Karnataka Row: सुप्रीम कोर्टात हरीश साळवे मांडणार महाराष्ट्राची बाजू; अजित पवारांचा खुलासा

पवार म्हणाले, सगळ्या नागरिकांना आम्हाला आवाहन करायचं आहे की, गेल्या सहा महिन्यात राज्यात जो काही कारभार सुरु आहे. यामध्ये महापुरुषांबाबत अपश्बद वापरण्याचं काम सुरु आहे. त्यांना कोणी आवरही घालत नाही. यामुळं जनतेत अस्वस्थता असून दोन दिवसांपूर्वी पुण्यात शाईफेकीची घटना झाली त्यानंतर वरळीला पुन्हा असाच प्रकार घडला. यावरुन जनतेत आक्रोश असल्याचं दिसून येतं.

ajit pawar
Maharashtra-Karnataka Row: शहांची नको मोदींची मध्यस्थी हवी; उदयनराजेंची आग्रही भूमिका

सीमाप्रश्न, महापुरुषांबाबत अपशब्द, महागाई, बेरोजगारी या गोष्टींचा धिक्कार करत त्यांना बाजूला काढण्यासाठी हा मोर्चा असमार आहे. या मोर्चामध्ये राजकीय पक्ष, नागरिक तसेच ज्यांना महापुरुषांच्या बदनामीमुळं त्रास झालाय ते सहभागी होतील. या मोर्चाला शिस्त राहिली पाहिजे, अतिशय शांततेच्या मार्गानं हा मोर्चा पार पडावा याच्या तयारीसाठी ही बैठक घेण्यात आली होती.

ajit pawar
Privacy Violation : पत्नीच्या प्रियकराचं लोकेशन शोधण्यापूर्वी....कोर्ट काय म्हणालंय एकदा वाचाच

मोर्चासाठी सर्व परवानग्या मागितल्या आहेत. अद्याप मोर्चाला परवानगी नाकारली गेलेली नाही, आमचा मोर्चा निघणार आहे. त्यामुळं परवानगी मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे. मुंबईसह महाराष्ट्रातून लोक मोर्चात सहभागी होतील. आजच्या पत्रकार परिषद घेण्याच कारणं ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी यात यावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com