

पाळी प्राण्यांच्या मृतदेहांवरही यापुढे अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. याबाबत नगर विकास विभागाकडून आदेश जारी करण्यात आलाय. तसंच प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करावी असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह कुठेही फेकून दिले जातात. त्यामुळे दुर्गंधी सुटते आणि रोगराई पसरण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून आदेश जारी करण्यात आला आहे.