Gopal Badne : मोठी बातमी ! फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिस ठाण्यात हजर, म्हणाला- मी प्रामाणिक...

Female Doctor Case : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने आहे. आत्महत्येनंतर बदने फरार झाला होता, त्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.
Suspended PSI Gopal Badne, the main accused in the Phaltan female doctor suicide case, appears at Phaltan police station after evading arrest for several days.

Suspended PSI Gopal Badne, the main accused in the Phaltan female doctor suicide case, appears at Phaltan police station after evading arrest for several days.

esakal

Updated on

Summary

बदने याने पोलिसांना चकवा देत कालपासून गुंगारा दिला होता.

त्याचे मोबाईल लोकेशन पंढरपूर परिसरात आढळून आले होता.

अखेर गोपाळ बदने स्वतःहून फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने फलटण पोलीसांच ठाण्यात हजर झाला आहे.महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर मुख्य आरोपी गोपाळ बदने फरार झाला होता तर दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली होती. बदने याने कालपासून गुंगारा दिला.ला अटक करण्यासाठी पोलिसांची चार पथके तैनात करण्यात होती. त्याचे लोकेशन पंढरपूर असल्याचे आढळून आले. मात्र त्याआधीच तो स्वत:हून फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com