भाजपच्या महाजनादेश यात्रेचा अंतिम टप्पा आजपासून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 September 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेच्या दोन टप्प्यानंतर आजपासून (13 सप्टेंबर ते गुरूवार 19 सप्टेंबर या कालावधीत) महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे.

 "मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेच्या दोन टप्प्यानंतर आजपासून (13 सप्टेंबर ते गुरूवार 19 सप्टेंबर या कालावधीत) महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून तिसरा टप्पा प्रारंभ होऊन नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 19 ला महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. 

यानिमित्ताने विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपा मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रव्यापी महाजनादेश यात्रेच्या पहिल्या व दुस-या टप्प्यानंतर विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आता महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे दोन टप्प्यात महाजनादेश यात्रेचा राज्यातील 24 जिल्ह्यातील 106 विधानसभा मतदारसंघातून 2 हजार 208 कि. मी. प्रवास झाला. आपल्या सरकारच्या पाच वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर जाऊन मांडणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. 

नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा समारोप होईल,यानिमित्ताने विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर भाजपा मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्‍यता आहे. महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा शुक्रवार 13 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून प्रारंभ होईल. तिसऱ्या टप्प्यात ही यात्रा 13 जिल्ह्यातील 60 विधानसभा मतदारसंघातून 1 हजार 528 कि. मी. प्रवास करणार आहे. गुरूवार 19 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे महासभेने महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Phase 2 of ‘Maha Janadesh Yatra’ begins, CM Fadnavis holds rally