Aadhaar : आठ वर्षांच्या मुलाचं आधार कार्ड, अन् फोटो देवेंद्र फडणवीसांचा! सात वर्षांपासून होतोय वापर

याच आधार कार्डच्या मदतीने या मुलाला शाळेत प्रवेशही मिळाला आहे.
Devendra Fadnavis Aadhaar
Devendra Fadnavis AadhaareSakal

देशात सर्व सरकारी योजना मिळवण्यासाठी आधार कार्डची गरज भासते. आपल्या भारतीय असण्याची एक ओळख म्हणजे आपलं आधार कार्ड. मात्र, याच आधार कार्डवर जर तुमच्याऐवजी दुसऱ्या कोणाचा फोटो असेल तर? हा फोटोही दुसऱ्या कोणाचा नाही, तर चक्क राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असेल तर?

चंद्रपूरमधील एका आठ वर्षांच्या मुलाच्या आधार कार्डवर चक्क राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या सात वर्षांपासून तो हे आधार कार्ड वापरतो आहे. आणि याच आधार कार्डच्या मदतीने त्याला शाळेत प्रवेशही मिळाला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आता हे आधार कार्ड चांगलंच चर्चेत आलं आहे.

Viral Aadhaar Card
Viral Aadhaar CardeSakal

सात वर्षांपूर्वी काढलं होतं कार्ड

चंद्रपुरातील सिंदेवाही तालुक्यात राहणाऱ्या जिगल जीवन सावसाकडे या मुलासोबत हा प्रकार घडला आहे. जिगलचा जन्म होऊन एका वर्षानंतर आधार कार्ड काढण्याच्या शिबिरात हे आधार कार्ड काढून घेतले होते. हे कार्ड आल्यानंतर त्यामध्ये जिगलच्या ऐवजी चक्क राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापून आला होता.

Devendra Fadnavis Aadhaar
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : उद्धवजी, तुम्हाला कुठे आणि कशी आग होतेय हे आम्हाला ठावूक! ;देवेंद्र फडणवीस

यानंतर जिगलच्या आईने हा फोटो बदलून घेण्यासाठी आधार केंद्रावर कित्येक चकरा मारल्या. मात्र, यामध्ये अजूनही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आधार कार्ड केंद्रचालकाने घातलेला हा घोळ या कुटुंबासाठी अगदीच त्रासदायक ठरतो आहे.

सध्या आठ वर्षांचा असलेला जिगल आजही हेच आधार कार्ड वापरतोय. हे आधार कार्ड वापरून त्याला शाळेत प्रवेशही मिळाला आहे. मात्र, भविष्यात इतर सरकारी योजना मिळवण्यासाठी, किंवा कोणत्याही कामासाठी हे आधार कार्ड नक्कीच वापरता येणार नाही. त्यामुळे हे कार्ड अपडेट करून घेण्यासाठी आता जिगलच्या आईची धावपळ सुरू आहे. जिगलचा जन्म त्याच्या आजोळी झाल्यामुळे, जन्मदाखल्यासाठी चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे अर्ज करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis Aadhaar
Karad : वाद चिघळणार! राड्यानंतर दोन्ही राजे उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला; फडणवीस कोणता घेणार निर्णय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com