Photography Competition
sakal
मुंबई - राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रवासी छायाचित्रणांच्या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धीसाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. प्रवासी छायाचित्रकारांच्या छायाचित्रांतील निवडक छायाचित्रातील प्रथम विजेत्याला पाच लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, असे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.