नाशिक : महिलांसह बहुजनांच्या शिक्षणाची मुहूर्तमेड रोवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आत्मसन्मान मिळवून देणारे महात्मा जोतिराव फुले हेच खरे महानायक असल्याने त्यांच्या पुतळ्यासोबत महिलांनी छायाचित्र काढून त्यांच्याप्रति जणू कृतज्ञता व्यक्त केली, असे चित्र विद्रोही साहित्य संमेलनाच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर दिसून आले.
शनिवारी (ता. ४) विद्रोही मराठी साहित्य संमेलनास केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरवात झाली. दिवसभर विविध कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन केले होते. मान्यवरांसह उपस्थितांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. हे शक्य होऊ शकले ते फक्त महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्यामुळे. अशा या महान व्यक्तिमत्त्वांतील महात्मा जोतिराव फुले यांचा पूर्णाकृती पुतळा साहित्य संमेलनाच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर स्थापित केला होता. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आकर्षण ठरत होता. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे पालक आपल्या पाल्यास आपल्या हाताचे बोट देऊन त्याचा आधार देत मार्ग दाखवत असतो. त्याचप्रमाणे महात्मा जोतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या हाताचे बोट धरून महिला छायाचित्र काढत होत्या. जणू महात्मा फुले या महिलांना आत्मसन्मानाने कसे जगायचे या मार्गावर नेत आहेत असे बघणाऱ्यांना भासत होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.