''सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही आशीर्वाद द्या, तब्येतीची काळजी घ्या''; PM मोदींचा शरद पवारांना फोन

PM Modi Calls Sharad Pawar After Hospital Discharge : 'तुम्ही इतकी वर्ष देशाला मार्गदर्शन केलं आहे. आता सुप्रिया सुळे आहेत. सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या आणि मार्गदर्शन करा,' असं पंतप्रधान मोदी म्हणाल्याची माहिती समोर आली आहे.
PM Modi Calls Sharad Pawar

PM Modi Calls Sharad Pawar After Hospital Discharge

esakal

Updated on: 

PM Modi Calls Sharad Pawar: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. यावेळी मोदींनी शरद पवारांना तब्येतीची काळजी घेण्याचा आणि पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. 'तुम्ही इतकी वर्ष देशाला मार्गदर्शन केलं आहे. आता सुप्रिया सुळे आहेत. सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या आणि मार्गदर्शन करा,' असं पंतप्रधान मोदी म्हणाल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...