उद्धव ठाकरेंचा शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवार) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. अभिनंदन, 'उद्धव ठाकरेजी आपली मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल'. 

उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज शिवाजी पार्क येथे पार पडला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक राजकीय नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. पंतप्रधान मोदी यांनीदेखील त्यांना ट्विट करत शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की अभिनंदन, उद्धव ठाकरेजी आपली मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल. मला विश्वास आहे, की महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण नक्कीच काम कराल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi wishing to Uddhav Thackeray after Maharashtra Government Formation