'या' प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली सोनं विकण्याची वेळ

nupur.jpg
nupur.jpg

मुंबई : रिझर्व्ह बँकेने ‘पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’ला नोटीस पाठवून निर्बंध जारी केल्यानंतर अनेक ग्राहकांना आर्थिक तंगीला सामोरं जावं लागत आहे. टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकार हिच्यावरही बिकट परिस्थिती ओढावली आहे. सोनं विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ आल्याचं नुपूरने सांगितलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Power ruins...good becomes brutal...masks r worn

A post shared by Nupur Alankar (@nupuralankar) on

अभिनेत्री नुपूर अलंकार ही ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ या हिंदी मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचली होती. मात्र 24 सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेला नोटीस जारी केली. सहा महिन्यांपर्यंत कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे पीएमसी बँक कोणत्याही प्रकारचे कर्ज देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ग्राहक आपल्या खात्यातून सहा महिन्यांत केवळ 25 हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढू शकतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Iconoclast I Am

A post shared by Nupur Alankar (@nupuralankar) on

नुपूरचे अकाऊंटही पीएमसी बँकेत असल्यामुळे तिला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. आयुष्यभराची पुंजी मी या बँकेत जमा केली होती. कठीण प्रसंगात आपल्यावर 50 हजार रुपयांचं कर्ज झाल्याचं तिने माध्यमांना सांगितलं. रोजच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला सोन्याचे दागिने विकावे लागल्याचंही नुपूरने सांगितलं.

नुपूरने अगले जनम मोहे बिटिया ही किजो, स्वरांगिनी, फुलवा, दिया और बाती हम यासारख्या अनेक हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पीएमसी बँकेचं कर्ज बुडवणाऱ्या सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांना अटक केली आहे. हे दोघे एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. पीएमसी बँकेचं कर्ज घेऊन बुडवणाऱ्या एकूण 44 मोठ्या खात्यांपैकी 10 खाती ही एचडीआयएल आणि वाधवान यांच्याशी संबंधित आहेत.

पीएमसी बँकेने ग्राहकांना एसएमएस पाठवून निर्बंधांविषयी माहिती दिल्यानंतर पीएमसी बँकेतून पैसे काढण्यासाठी शाखांबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com