पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावातील वडिलांनी स्वतःच्या २४ वर्षीय मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना मंगळवारी (ता. २३) सायंकाळी घडली..घटनेनंतर फरार झालेल्या वडिलांना पोलिसांनी पाच तासांत ताब्यात घेतले. सचिन बजरंग चिकणे हे काही महिन्यांपूर्वी मुंबईहून पोलादपूर शहराजवळील लोहारे देऊळकोंड येथील आडरस्त्यावरील निर्जन इमारतीत राहण्यास आले होते. .मंगळवारी सायंकाळी अज्ञात कारणावरून संतप्त झालेल्या सचिन यांनी त्यांचा मुलगा साहिल सचिन चिकणे (वय २४) याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या वेळी साहिल कांदा कापत होता..Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर .हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साहिलचा मृत्यू झाला. त्यानंतर सचिन घटनास्थळावरून फरार झाले. मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे सचिन चिकणे यांना ताब्यात घेण्यात आले. साहिल चिकणे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे..बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत.५८ ग्रॅम एमडीसह दोघांना अटककोहजगाव परिसरात सापळा रचून अंबरनाथ पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख ६० हजार रुपये किमतीचे ५८ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी), दुचाकी आणि दोन हत्यारे असा १३ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला. फादर अॅन्जल स्कूलजवळील सार्वजनिक रस्त्यावर मंगळवारी (ता. २२) गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.