पोलिस आयुक्त म्हणाले..! सोलापुरात ‘डीजे’ला बंदी, कोणीही बुकिंग करू नये; मिरवणुकीत आवाजाची मर्यादा पाळून लावता येणार 4 स्पीकर, वाचा...

गणेशोत्सवापासून सोलापूर शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी केली आहे. आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकादेखील डीजेमुक्त व्हाव्यात, यासाठी पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बैठका घेत आहेत. आज एमआयडीसी व फौजदार चावडी पोलिस ठाण्यात बैठक झाली.
solapur city cp m raj kumar

solapur city cp m raj kumar

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : गणेशोत्सवापासून सोलापूर शहर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी केली आहे. आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकादेखील डीजेमुक्त व्हाव्यात, यासाठी पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बैठका घेत आहेत. आज एमआयडीसी व फौजदार चावडी पोलिस ठाण्यात बैठक झाली. ‘डीजे’ला बंदी असल्याने कोणत्याही मंडळाने ‘डीजे’साठी ॲडव्हान्स देऊ नये, अन्यथा आर्थिक नुकसान होईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शांतता, निवासी, व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रासाठी आवाजाची मर्यादा निश्चित झाली आहे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाउडस्पीकर किंवा साऊंड सिस्टीम वापरण्यावरही निर्बंध आहेत. तरीपण, राज्यात सर्वाधिक सण-उत्सव साजरा करणाऱ्या सोलापूर शहरातील प्रत्येक मिरवणुकीत ‘डीजे’चा दणदणाट ऐकायला मिळत होता. त्याचा त्रास मिरवणूक मार्गांवरील रहिवासी, दवाखान्यातील रुग्ण, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना सोसावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’च्या पुढाकाराने ‘डीजेमुक्त सोलापूर कृती समिती’च्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, शाळकरी मुले, सर्वसामान्य सोलापूरकरांनी ‘डीजे’ बंदीसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी ‘डीजे’वर कायमचे निर्बंध घातले. त्यानुसार शहरातील सात पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी अंमलबजावणी करीत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकाही डीजेमुक्त निघतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस ठाण्यांमधील बैठकांमध्ये सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

पोलिसांकडून मंडळांना सूचना

  • मंडळांनी विनापरवाना मिरवणूक काढू नये.

  • कोणीही मिरवणुकीत ‘डीजे’चा वापर करू नये, पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.

  • विनापरवाना डीजिटल फलक लावू नये, लेझर लाईटचा वापर करू नये.

  • मिरवणुकीत डीजेचा वापर केल्यास संबंधितांवर कारवाई होईल आणि डीजे जप्त केला जाईल.

सोलापूर शहर डीजेमुक्त, सर्वांनी नियमांचे पालन करावे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोलापूर शहरात ‘डीजे’साठी बंदी आहे. आतापर्यंत सर्वच मिरवणुका डीजेमुक्त निघाल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढल्या जाणाऱ्या मिरवणुका देखील डीजेमुक्त निघतील. तत्पूर्वी, सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या पोलिस ठाण्यांमध्ये बैठका घेऊन त्यासंदर्भातील आवाहन केले जात आहे. कोणी डीजे बुकिंग केल्यास त्यांचे नुकसान होऊ नये, हा त्यामागील हेतू आहे.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

चार स्पीकरसाठी परवानगी

आवाजाची मर्यादा पाळून मंडळांना मिरवणुकीत चार स्पीकर लावता येतील. देखावे, सामाजिक उपक्रमांवर मंडळांनी खर्च करावा, जेणेकरून महिला, लहान मुले-मुलींना मिरवणुका पाहता येतील, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. गणेशोत्सवापासून सर्वच मिरवणुकांमध्ये डीजे दिसलेला नाही. ही प्रथा कोणीही मोडणार नाही, याची खबरदारी पोलिस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com