पोलिस आयुक्तांचे आवाहन..! गुन्हा दाखल झाल्यावर उद्‌ध्वस्त होईल भविष्य; ‘डीजे’ला कोणालाही नसणार परवानगी, वाचा...

गणेशोत्सवापासून शहरात कोणालाही ‘डीजे’साठी परवाना दिलेला नाही. यापुढे कोणालाही ‘डीजे’ लावण्यासाठी परवानगी मिळणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वांनी कायद्याचे पालन करून उत्साहात साजरी करावी. कायद्याचे उल्लंघन झाल्यावर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील आणि त्यांचे भविष्य उद्‍ध्वस्त होईल, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी केले आहे.
solapur city cp m raj kumar

solapur city cp m raj kumar

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : गणेशोत्सवापासून शहरात कोणालाही ‘डीजे’साठी परवाना दिलेला नाही. त्यामुळे आता यापुढे कोणालाही ‘डीजे’ लावण्यासाठी परवानगी मिळणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वांनी कायद्याचे पालन करून उत्साहात साजरी करावी. कायद्याचे उल्लंघन झाल्यावर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील आणि त्यांचे भविष्य उद्‍ध्वस्त होईल, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी केले आहे.

सोलापूर शहरात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजे बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये. आपल्यावर केस होऊन भविष्याचे नुकसान होईल, असे कृत्य कोणीही करू नये. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचना, अटी व शर्थीचे पालन करून सर्वांनी जयंती उत्सव साजरा करावा. कोणीतरी फूस लावून आपल्याला पुढे करतील, पण त्यावेळी भविष्याचा विचार करून कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन देखील पोलिस आयुक्तांनी केले आहे.

एकदा केस दाखल झाली की तो तरुण पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो. त्यानंतर त्या तरुणास कोठेही नोकरी मिळत नाही, परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट मिळत नाही, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.

पोलिसांना दोनदा बंदोबस्ताची ड्यूटी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळ्याची मिरवणूक रविवारी (ता. १९) काढणार असल्याचे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी जाहीर केले आहे. तर मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त राजाभाऊ सरवदे यांनी मंगळवारी (ता.२१) मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर शहरात सुमारे २५० मंडळे जयंती साजरी करतात. त्यातील ८० ते ८५ मंडळांच्या मिरवणुका निघतात. दोन वेगवेगळ्या दिवशी मिरवणुका निघणार असल्याने पोलिसांना दोन्ही दिवशी बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागणार आहे. दुसरीकडे रविवारी (ता. १९) अक्षय्यतृतीया असून त्याच दिवशी बसवेश्वर जयंती, परशुराम जन्मोत्सव देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com