पोलिस आयुक्तांचे आदेश! वाहनांवर ध्वनीक्षेपक लावून प्रचार करणे, होर्डिंग्ज लावणे, विनापरवाना शस्त्र वापरणे, वाहनांची रॅली काढणे, यावर ‘हे’ निर्बंध

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी सहापूर्वी ते रात्री दहानंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर व कोणत्याही परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांवरील ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, आवाजसह वाहनांना फिरता येणार नाही.
Local Body Election

solapur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत

esakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. शनिवारी (ता. ३) चिन्ह वाटपानंतर प्रचाराला सुरवात होईल. प्रमुख पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्या असून आता प्रचाराच्या निमित्ताने कोणीही कायद्याचे उल्लंघन करु नये, असे आवाहन शहर पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी केले आहे. विनापरवाना शस्त्र बाळगणे, होर्डिंग्ज, बॅनर लावणे, रॅली काढणे, मोठ्या आवाजाचे ध्वनीक्षेपक लावणे, धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करणे, अशा गोष्टी करु नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी सहापूर्वी ते रात्री दहानंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर व कोणत्याही परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांवरील ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, आवाजसह वाहनांना फिरता येणार नाही. सर्व उमेदवार व राजकीय पक्षांनी ठराविक ठिकाणी थांबून ध्वनीक्षेपकाद्वारे प्रचार करण्याची परवानगी घेतली असल्यास त्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिस ठाण्यास कळवावी, असे आवाहन देखील पोलिस आयुक्तांनी केले आहे. पोलिस आयुक्तांचे आदेश आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत म्हणेच १५ जानेवारीपर्यंत लागू असणार आहेत.

पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार...

  • बॅंका, एटीएम, शासकीय व खासगी कार्यालयातील सुरक्षारक्षकांकडील परवान्याची शस्त्रे वगळता बाकीच्यांकडे परवानगीशिवाय जवळ बाळगता येणार नाहीत.

  • कोणत्याही वाहनाच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने किंवा गाड्या (तीन वाहने चारचाकी किंवा तीन चाकी व अन्य वाहने दुचाकी) असतील तर वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतिबंध असेल. तथापि, दहा वाहनांच्या एका ताफ्यानंतर त्यात १०० मीटरचे अंतर ठेवतील.

  • निवडणूक प्रचारासाठी झेंडे लावणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रके लावणे किंवा घोघणा लिहिण्यासाठी खासगी व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्यांची जागा, इमारत, भिंतीचा वापर करता येणार नाही. त्याशिवाय स्थानिक प्राधिकरणाचीही परवानगी लागेल.

  • धार्मिक तथा प्रार्थना स्थळांचा वापर निवडणूक प्रचाराचे व्यासपीठ म्हणून प्रचार करु नये. कोणत्याही प्रार्थना स्थळांचा वापर निवडणूक कामासाठी करता येणार नाही. याशिवाय निवडणुकीसंदर्भातील पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग्ज किंवा कमानी लावण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घ्यावी. वाहतुकीला, रहदारीला त्याचा अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com