
शिपाई बनणार हवालदार तर, पोलीस उपनिरीक्षक होणार फौजदार
पोलिस (Police) दलामध्ये 30 वर्षे काम केलेल्या आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector of Police) पदावर तीन वर्षे काम केलेल्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासंदर्भात कार्यवाही सुरु झाली आहे. यामुळे मुंबईसह (Mumbai)राज्यभरातील हजारो सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हे आता लवकरच फौजदार होणार आहेत.
हेही वाचा: भारतीय लष्कर, पोलीस दलासह 'या' विभागात होणार भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
आश्वासित प्रगती योजनेनुसार साखळी पदोन्नती मिळवण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी निर्णय दोन महिन्यांपूर्वीच घेतला होता. त्यामध्ये शिपाई पदानंतरचे नाईक हे पद रद्द केल्यानंतर शिपायांना थेट हवालदार पदाची संधी देण्यात आली होती. तसेच सहाय्यक पोलिस उप निरीक्षक यांना उप निरीक्षक पदाची संधी दिली होती. सध्या या पोलिस निरीक्षकांना उप निरीक्षक पदाची संधी देण्यात आली. याबाबत पोलिस महासंचालक कार्यालयाने आदेश काढले आहेत. अंमलदार संवर्गासाठी पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्यासाठी ही उपनिरीक्षक पदाची पदोन्नती सुरु करण्यात आली आहे.
हेही वाचा: पोलीस भरतीत 'डमी' पाठवले, बोगस भरतीचा पर्दाफाश
या सहाय्यक पोलिस उप निरीक्षकांना पोलिस दलामध्ये 30 वर्षे सेवा पूर्ण झालेले आहेत. त्यांना या पदावरील तीन वर्षे काम पूर्ण तसेच आश्वासित प्रगती योजनेच्या लाभानुसार पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या पदाची वेतन श्रेणी घेत असलेले असे तीन निकष पूर्ण करणाऱ्यांना सहाय्यक पोलिस उप निरीक्षक पदाची पदोन्नती देण्यात येत असल्याच्या सूचना राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल (Sanjeev Kumar Singhal) यांनी काढलेल्या आहेत.
Web Title: Police Constable Will Be Direct Constable The Police Sub Inspector
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..