Crime:बुटीबोरी परिसरात अंमली पदार्थाची विक्री, पोलिसांनी कारवाई करत विक्रेत्याला केली अटक

सध्या स्थिती पाहता हा तरुणवर्ग झपाट्याने नशेच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे पालकांच्या मनात आपल्या पाल्याच्या भविष्याला घेऊन सर्वात मोठी चिंता निर्माण झाली आहे.
ganja
ganjasakal
Updated on

Marijuana:बुटीबोरी परिसरात अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत असून युवक त्याच्या आहारी जात आहे. यामुळे भावी पिढी बरबाद होण्याची चिन्हे असून यावर अंकुश मिळवावा आणि विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश कॉग्रेसचे महासचिव मुजीब पठाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

देशाचे भविष्य म्हणजे आजचा तरुण वर्ग होय. या तरुणांपासून देशाला तसेच त्यांच्या आईवडिलांना अनेक अशा जुळल्या आहेत. परंतु सध्या स्थिती पाहता हा तरुणवर्ग झपाट्याने नशेच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे पालकांच्या मनात आपल्या पाल्याच्या भविष्याला घेऊन सर्वात मोठी चिंता निर्माण झाली आहे.

परिसरात अमली पदार्थांच्या होणाऱ्या वापरामुळे तरुणपिढीचे आयुष्य बरबाद होत आहे. त्यामुळे अशा पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर अंकुश लावावा,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मुजीब पठाण यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड, बुटीबोरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार भीमाजी पाटील व एमआयडीसीचे ठाणेदार महादेव आचरेकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

बुटीबोरी औद्योगिक परिसर असल्याने येथे अनेक राज्यांतील लोक वास्तव्यास आहेत. येथे अमली पदार्थ विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. काही दिवसांपासून परिसरात विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थी काही असामाजिक तत्त्वाच्या संपर्कात आल्याने ते एमडी पावडर, गांजा, प्रतिबंधित तंबाखू, विदेशी सिगारेटच्या अधीन गेल्याचे चित्र दिसत आहे. सुनसान ठिकाणी या नशेखोरांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा रस्त्याने जाणे महिला व मुलींकरिता धोकादायक आहे.आजची पिढी नशेच्या आहारी गेल्याने पालक चिंतित आहेत. ठिकाणी होणाऱ्या प्रतिबंधित अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी आळा घालावा,अशी मागणी मुजीब पठाण यांनी केली आहे.

याप्रसंगी नागपूर जिला कॉंग्रेस कमिटीचे महासचिव राजू गावंडे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युसूफ शेख, नसीर शेख, इंटकचे अधक्ष गजानन गावंडे, एनएसयूआयचे प्रदेश सचिव नागेश गिऱ्हे ,नागपूर जिला युवक कॉंग्रेस महासचिव राहुल पटले, हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस महासचिव तुषार ढाकणे, हिंगणा विधानसभा युवक कॉंग्रेस महासचिव रजत वरघने, बुटीबोरी युवक कॉंग्रेस अध्यक्ष अश्विन वानखेडे,कैलास बेलेकर,अल्ताफ शेख,सुकचंद होते.(Latest Marathi News)

ganja
Nawazuddin Siddiqui: 'ठाकरे' नंतर नवाजुद्दीनचा आणखी एक बायोपीक, साकारणार या अधिकाऱ्याची भुमिका

चनकापूर येथे गांजा विकणाऱ्यास अटक

चनकापूर परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. शेख जमाल मु. वॉर्ड क्रमांक ६ चनकापूर असे आरोपीचे नाव आहे. जप्त केलेल्या गांजाचे वजन ४३५.०६ ग्रॅम असून त्याची किंमत १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. खापरखेडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ८ (अ), २० (ब) (अ) एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले. बुधवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड म्हणाल्या की," कायदेशीर कारवाई करू. जे तरुण नशेच्या आहारी गेले अशा मुलांच्या पालकांनी संबंधित विभागाशी संपर्क करावा.जेणेकरून त्यांचे समुपदेशन करून तरुणांचे भविष्य घडविण्यास मदत होईल." (Latest Marathi News)

ganja
Asian Para Games 2023: तिरंदाजीत भारताला मिळाले पहिले 'गोल्ड मेडल', राकेश अन् शीतलने जिंकले सुवर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com