esakal | मोठी ब्रेकिंग! पोलीस पाटलांना पाच महिन्यांपासून मानधनच नाही 
sakal

बोलून बातमी शोधा

policepatilkham_201903208325 (1) - Copy.jpg

तलाठी, ग्रामसेवक गावात येतच नाहीत 
ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अन्‌ गावात येणाऱ्या प्रत्येकांची खबर पोलिसांपर्यंत पोहचविण्याच्या हेतूने गावोगावी ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये विकास सोसायट्यांचे सचिव, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटलांचा समावेश आहे. तलाठी, ग्रामसेवकांना संबंधित गावात राहणे बंधनकारक करण्यात आले असतानाही बहुतांश तलाठी, ग्रामसेवक गावाकडे फिरकलेच नाहीत, असे पोलीस पाटील संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले. त्यामुळे परगावाहून आलेल्या व्यक्‍तीची माहिती पोलिसांना देणे, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींचा शोध घेण्यासारखी कामे जिल्ह्यातील 917 पोलीस पाटील करीत आहेत. दुसरीकडे तलाठी, ग्रामसेवकांना दरमहा पगार दिला जातो, अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली. 

मोठी ब्रेकिंग! पोलीस पाटलांना पाच महिन्यांपासून मानधनच नाही 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या महामारीत ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून या राज्यातील 27 हजार 120 पोलीस पाटील कोरोना योध्दा म्हणून काम करीत आहेत. मात्र, त्यांना मार्चपासून मानधनच मिळालेले नाही. पोलीस पाटलांच्या मानधनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 117 कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र, आता वरिष्ठ अधिकारी राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याची कारणे सांगू लागले आहेत.

गावातील तंटे मिटवणे, शांतता व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांच्या मानधनात (साडेसहा हजार रुपये) वाढ करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने 8 मार्च 2019 मध्ये घेतला. मात्र, अर्थसंकल्पात तरतूद न केल्याने त्यांना नियमित मानधन मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या. महाविकास आघाडी सरकारने पोलीस पाटलांच्या मानधनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली. त्यामुळे आता मार्च 2020 पासून नियमित मानधन मिळेल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मात्र, त्यानंतरही त्यांना मानधनासाठी चार-सहा महिने वाट पाहावीच लागत आहे. मार्चपासून मानधनाविना काम करुनही त्यांना शासनाकडून मार्च-एप्रिलपर्यंतच्या मानधनापुरताच निधी वितरीत करण्यात आला आहे.


तलाठी, ग्रामसेवक गावात येतच नाहीत 
ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अन्‌ गावात येणाऱ्या प्रत्येकांची खबर पोलिसांपर्यंत पोहचविण्याच्या हेतूने गावोगावी ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये विकास सोसायट्यांचे सचिव, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटलांचा समावेश आहे. तलाठी, ग्रामसेवकांना संबंधित गावात राहणे बंधनकारक करण्यात आले असतानाही बहुतांश तलाठी, ग्रामसेवक गावाकडे फिरकलेच नाहीत, असे पोलीस पाटील संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले. त्यामुळे परगावाहून आलेल्या व्यक्‍तीची माहिती पोलिसांना देणे, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्‍तींचा शोध घेण्यासारखी कामे जिल्ह्यातील 917 पोलीस पाटील करीत आहेत. दुसरीकडे मात्र, शासनाच्या अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी 64 लाख मिळाले 
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या मानधनापोटी 64 लाखांचा निधी अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाला आहे. त्यानुसार बिल तयार केले असून आता त्यातून पोलीस पाटलांना मार्च-एप्रिलपर्यंतचे मानधन दिले जाईल. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर उर्वरित महिन्यांचेही मानधन वितरीत करण्यात येईल. 
- अतूल झेंडे, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर