कल्याण रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली. पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानकावर धाव घेऊनबॉम्बचा शोध घेण्यास सुरू केली. श्वान पथकाच्या माध्यमातून बॉम्बचा शोध घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. यामुळे काही काळ स्टेशनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.